महिलेची वॉचमनला बेदम मारहाण, CCTV मध्ये संपूर्ण प्रकार कैद; पाहा VIDEO

Hyderabad CCTV: हैदराबादहून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला सुरक्षा रक्षकाला निर्दयपणे मारहाण करताना दिसत आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

cctv 1
महिलेची वॉचमनला बेदम मारहाण, CCTV मध्ये संपूर्ण प्रकार कैद  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • महिलेची इमारतीच्या वॉचमनला बेदम मारहाण
  • मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल

हैदराबाद: हैदराबादच्या चंद्रनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने महिलेविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीने महिलेने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप  केला आहे. माराहाणीची ही संपूर्ण घटना त्या भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, एक महिला वॉचमनला थेट मारहाण करत आहे. मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव श्री लक्ष्मी  असल्याचं समजतं आहे. ही महिला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका कारमधून अपार्टमेंटमध्ये आली. त्यानंतर ती गाडीतून खाली उतरताना दिसत आहे आणि नंतर तिने थेट सुरक्षा रक्षकालाच मारहाण करण्यास सुरवात केली. आधी तिने वॉचमनला सलग श्रीमुखात भडकवल्या. त्यानंतर थेट आपल्या पायातील चप्पल काढून तिने त्याला चप्पलने मारहाण करण्यास सुरवात केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये देखील व्हायरल होत आहे. 

या घटनेनंतर पीडित चौकीदार ज्याचं नाव रफीक असल्याचं समजतं आहे. त्याने थेट स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन महिलेविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यांना एका चौकीदाराची तक्रार मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर याप्रकरणी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी