Viral Video: सोशल मीडियात कधी कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे आपण सांगू शकत नाही. काही व्हिडिओ, फोटो इतके मजेदार असतात की आपण हसू-हसून लोटपोट होतो. तर काही घटना अशा असतात की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आता असाच काहीसा प्रकार समोर आला हे. जेथे एक महिला आपल्या सासरी चक्क जेसीबी घेऊन पोहोचली. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
यावेळी महिलेच्या सोबत पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे ही घटना घडली आहे. या महिलेला सासरी प्रवेश दिला जात नव्हता त्यामुळे ती थेट जेसीबीच घेऊन सासरी दाखल झाली. तिच्या मदतीसाठी यावेळी पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? पाहा हा व्हिडिओ.