Rajasthan News: जयपूर : राजस्थानमध्ये एका महिलेने चार हात, चार पाय असलेल्या तसेच छातीपासून चिकटलेल्या जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. या बाळांना पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. राजस्थानच्या कुचेरा जवळील बासनी गावात ललिता (23) या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीपूर्वी जेव्हा महिलेची सोनोग्राफी केली तेव्हा बाळांची स्थिती सामान्य नसल्याचे निदर्शनास आले होते. (women in rajsthan give birth rare twin connected with chest both are stable)
अधिक वाचा : Viral Video : वाघाच्या जवळपास फिरत होती हरणं, वाघाच्या वर्तणुकीमुळे व्हिडीओ होतोय व्हायरल
ललिता यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ललिता यांची डॉक्टरांनी प्रसूती केली तेव्हा चार हात, चार पाय आणि दोन मुंडकी असलेले छातीपासून चिकडलेली दोन मुले होती. अशा प्रकारच्या बाळांना वैद्यकीय भाषेत थोरेकोपेगस म्हणतात. अशा प्रकाराच्या जुळ्या मुलांच्या बाबतीत 75 टक्के प्रकरणात बाळांचे एकच हृदय असतं. या दोन बाळांना वेगवेगळे करताना अडचणी येतात. कधी कधी बाळांचे यकृतही जोडलेले असते आणि अशावेळी ही शस्त्रक्रिया आणखी जटिल होते.
अधिक वाचा : Viral News : डॉक्टरांनी सुंदर हस्ताक्षरात लिहिली औषधांची चिठ्ठी, नेटकरी झाले आश्चर्यचकित
दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दीड ते दोन लाख केसेसमध्ये अशा एक दोन केसेस असतात असे डॉक्टर म्हणाले. जुळी मुलं एकमेकांना चिकटलेली होती म्हणून नॉर्मल डिलिव्हरी करणे अशक्य होते असे डॉक्टर म्हणाले. मुलांचे वजन 4 किलो आहे.