Viral: तरुण दिसण्यासाठी मॉडलने केल्या 200 शस्त्रक्रिया, खरे वय सांगणे झाले कठीण!

Viral News: अमेरिकेतील व्हर्जिनियास्थित लेसी वाइल्डने तरुण दिसण्यासाठी तब्बल 200 शस्त्रक्रिया केल्या आहेत, ज्यासाठी तिने सुमारे 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. लेसी ही एक टेलिव्हीजन कलाकार आणि मॉडेल आहे.

Updated May 8, 2023 | 05:43 PM IST

American Model Lacey Wild

तरुण दिसण्यासाठी 200 शस्त्रक्रिया !

American Model Lacey Wildd: आजकालच्या महिला आपले सौंदर्य दाखवण्यासाठी काय करतील आणि काय नाही हे सांगणे कठीणच झाले आहे. कोणी सुंदर दिसण्यासाठी तर कोणी आपली उंची वाढवण्यासाठी काही न काही उपाय करताना दिसत असतात. जगभरात असे प्रकार सुरू आहेत. असेच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आले आहे, जिथे एका महिलेने स्वतःहून सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या महिलेने एक-दोन नव्हे तर 200 शस्त्रक्रिया केल्या आहेत ज्यांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्या महिलेचे नाव आहे लेसी वाइल्ड.
लेसी ही टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे, तिने चिरतरुण दिसण्यासाठी 200 शस्त्रक्रिया केल्या असून त्यासाठी तिने सुमारे 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. लेसी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे नवनवीन फोटो ती शेअर करत असते. सध्या लेसीचे वय 54 वर्षे आहे पण तिचे फोटो पाहून तुम्ही तिच्या वयाचाही अंदाज लावू शकत नाही. कारण ती 30 वर्षांच्या मुलीसारखी दिसते. लेसीचे खरे नाव पाउला थेबर्ट आहे.

लेसीचे सौंदर्य पाहून तरुण मुलींना वाटतो आहे हेवा

लेसी वाइल्ड सांगते की, अनेक शस्त्रक्रिया केल्यानंतर आता डॉक्टरांनी तिला पुढील शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली आहे. आता तिचे सौंदर्य पाहून इतर मुलींना तिचा हेवा वाटू लागला आहे. याचे कारण म्हणजे तिच्या फिगरमुळे प्रत्येक मुलगा तिला डेट करू इच्छितो. खरे तर लेसीचा एक मुलगा 35 वर्षाचा आहे. मात्र तो तिचा प्रियकरच आहे असे लोकांना वाटून जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लेसीला एकूण 6 मुले आहेत!
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited