आता तर हद्दच झाली ना राव! मेट्रोमध्ये लिपलॉकमध्ये हरवलं प्रेमीयुगुल, पाहा फोटो..

Delhi Metro Viral Photo: दिल्ली मेट्रो (Delhi Metro) गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. मेट्रोमध्ये काही प्रवाशी अश्लिल चाळे करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) होत आहेत. अशातच एक फोटोची सध्या चर्चा आहे. एक प्रेमीयुगुल मेट्रोमध्ये खुल्लम खुल्ला लिपलॉक करताना दिसत आहे.

Updated May 10, 2023 | 07:43 PM IST

Delhi Metro Viral Photo, Viral Photo, Trending Photo

सर्वांत देखील लिपलॉक...

फोटो साभार : Times Now
Delhi Metro Viral Photo: दिल्ली मेट्रोतील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर सध्या प्रेमीयुगुलाचा एक फोटो तुफान व्हायरल (Viral Photo) होत आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रो (Delhi Metro) देखील चर्चेत आली आहे. व्हायरल फोटोमध्ये प्रेमीयुगुल चक्क मेट्रोमध्ये खुल्लम खुल्ला लिपलॉक करताना दिसत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये अश्लिल चाळे केल्याचं दिसत असल्याने सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स देखील थक्क झाले आहेत.

सर्वांत देखील लिपलॉक...

दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro Viral Photo) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक प्रेमीयुगुल खुलेआम लिपलॉक करताना दिसत आहे. फोटो पाहून युजर्सकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

काय आहे व्हायरल फोटोत...

व्हायरल झालेल्या फोटो दिल्ली मेट्रोमधील असल्याचं समजतं. एक प्रेमीयुगुल फरशीवर बसलेलं दिसत आहे. तरुणी एका तरुणाच्या मांडीवर लेटली आहे. थक्क करणारी बाब म्हणजे तरुणी खुलेआम तरुणासोबत लिपलॉक करत आहे. धक्कादायक म्हणजे तरुण-तरुणी लिपलॉकमध्ये इतके हरवले आहेत की ते कुठे आहेत याचं देखील त्यांना भान राहिलेलं नाही.
अशाच त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलेल्या एक प्रवाशाने तरुण-तरुणीचा लिपलॉक मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. आता प्रेमीयुगुलाचे लिपलॉकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल फोटोमुळे उडाली खळबळ

दिल्ली मेट्रोमध्ये खुलेआम लिपलॉक करणाऱ्या प्रेमयुगुलाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया युजर्स देखील संतापले आहेत. काही प्रवाशांनी तर डीएमआरसीवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्ली मेट्रो प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल देखील काही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
एका यूजरने म्हटलं आहे, की तरुणी नशेत आहे. तर कोरोना पीडितला तोंडावाटे श्वास देऊन तिचे प्राण वाचवले जात असल्याचं म्हणत दुसऱ्यानं खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, दिल्ली मेट्रोतील प्रेमीयुगुलांचे फोटो व्हायरल झाल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. या आधी अनेकदा मेट्रोमधील असले फोटो व्हायरल झाले होते. याबाबत दिल्ली डीएमआरसीने गाईडलाईन्स जारी केली आहे. महिला प्रवाशांनी तोकडे कपडे परिधान करू नये. याशिवाय प्रवासादरम्यान गैरवर्तवणूक करू नये. त्यानंतर देखील प्रेमीयुगुलाचा लिपलॉकचा फोटो व्हायरल झाल्याने दिल्ली डीएमआरसी आता काय ठोस पाऊल उचलते, याकडे लक्ष लागलं आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited