लग्न मंडपातून नवरदेवाने काढला पळ, 20 किलोमीटर पाठलाग करत वधूने पकडले अन् लग्नाला मंडपात बसवले

एका प्रेमी जोडप्याचं लग्न ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेत होण्यापूर्वी असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नववधू नटून-थटून मंडपात आली मात्र, लग्न विधी सुरू होण्यापूर्वीच नवरदेव अचानक गायब झाला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या....

Updated May 22, 2023 | 03:14 PM IST

लग्न मंडपातून नवरदेवाने काढला पळ, 20 किलोमीटर पाठलाग करत वधूने पकडले अन् लग्नाला मंडपात बसवले
Groom Run Away from Mandap Marriage Pandal: एक तरुण आणि तरुणी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमात होते. अखेर या प्रेमी जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बरेलीतील भूतेश्वर नाथ मंदिर परिसरात मंडप सजवण्यात आला. मात्र, लग्नापूर्वी नवरदेवाचा अचानक मूड बदलला आणि लग्न मंडपातूनच त्याने पळ काढला. बराच वेळ झाला तरी नवरदेव लग्न मंडपात येत नसल्याने चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर नवरदेव हा पळून गेल्याच लक्षात आलं.
रविवारी भूतेश्वर नाथ मंदिर परिसरात हा विवाह सोहळा होणार होता. संपूर्ण तयारी झाली होती. नववधू नटून-थटून मंडपात पोहोचली आणि नवरदेवाची वाट पाहत होती. तेव्हा नववधूने नवरदेवाला फोन केल्यावर नवरदेवच मंडपातून पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर नववधूनेच नवरदेवाला पकडून आणण्याचं ठरवलं.
आपण आईला बोलवण्यासाठी बिसौली येथे जात असल्याचं नवरदेवाने नववधूला सांगितलं. त्यानंतर नवरदेवाने बस पकडून निघाला. मग, नववधूने सुद्धा दुसऱ्या गाडीने त्या बसचा पाठलाग सुरू केला. अखेर 20 किलोमीटर अंतरावर या बसला थांबवण्यात आलं. वधूने नवरदेवाला बसमधून खाली उतरवलं आणि थेट लग्न मंडपात घेऊन पोहोचली. या संपूर्ण काळात जवळपास 2 तास निघून गेले होते. लग्न मंडपातून नववधू आणि नवरदेव गायब असल्याने मोठी गर्दी जमा झाली होती.
हे तरुण-तरुणी प्रेमात होते. अडीच वर्षे दोघांचे प्रेम संबंध होते आणि दोघांनीही एकत्र जगण्या-मरण्याची शपथ घेतली होती. अखेर दोघांच्या आई-वडिलांनी या तरुण-तरुणीचं लग्न लावण्याचं ठरवलं. त्यानुसार, रविवारी बरेली येथील भूतेश्वर नाथ मंदिर परिसरात लग्न करण्याचं ठरलं. मंदिर परिसरात मंडप बांधण्यात आला. या मंडपात दोघांचा विवाह सोहळा पार पडणार होता मात्र, ऐन लग्नापूर्वी नवरदेवच पळून गेल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अखेर नववधूने त्याला पकडून आणले आणि मग या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited