कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना भाजप कार्यालयात शिरला साप आणि मग...., पाहा VIDEO

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू असतानाच भाजप कार्यालयात साप शिरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

Updated May 13, 2023 | 04:03 PM IST

कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना भाजप कार्यालयात शिरला साप आणि मग...., पाहा VIDEO
Snake entered BJP camp office premises in Shiggaon: कर्नाटक विधानसभा (Karnataka Assembly) निवडणुकीची मतमोजणी सकाळीच सुरू झाली. मतमोजणी सुरू असल्याने उमेदवारांची धाकधूक सुद्धा वाढली होती. त्याच दरम्यान भाजपच्या कार्यालयात साप शिरल्याची बातमी आली. निवडणुकीची मतमोजणी सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात आणि परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, त्याच दरम्यान कार्यालयात साप शिरल्याने एकच गोंधळ उडाला.
ही घटना कर्नाटकातील शिगांव येथील भाजप कार्यालयात घडला. सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि त्याचवेळी भाजपच्या कार्यालयात साप शिरला. कार्यालयात साप पाहून सर्वांनाच घाम फुटला आणि त्यानंतर या सापाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तात्काळ सर्पमित्रांना सुद्धा बोलवण्यात आले. अखेर या सापाला पकडण्यात आले आणि सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सापाचा व्हिडिओ व्हायरल
भाजप कार्यालयात साप शिरल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटलं, थकवलेले पैसे वसूल करण्यासाठी गेल्याचं वाटत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूव्ज मिळाले आहेत. याचा व्हिडिओ न्यूज एजन्सी एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

भाजपला पराभवाचा धक्का
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 130 हून अधिक जागांवर विजयी आघाडी मिळवली. भाजप 23 जागांवर विजयी आणि 40 जागांवर आघाडीवर आहे. जनता दल सेक्युलर पार्टी 9 जागांवर विजयी आणि 11 जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापनेच्या दिशेने वेगाने वाटचाल केली आहे. सध्या सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आता कर्नाटकमध्ये मुख्य विरोधी पक्ष होणार हे निश्चित झाले आहे. जनता दल सेक्युलर पार्टी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited