ट्रेंडिंग:

'कधी त्याचे गाल पकडत आहे तर कधी..., बाहेर करा हे सर्व' कपलच्या त्या कृत्यावर भडकली महिला, मेट्रोतील VIDEO VIRAL

Viral Video: सोशल मीडियात एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला कपलवर चांगलीच संतापल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ मेट्रोतील असल्याची माहिती समोर आली आहे.

Updated Sep 8, 2023 | 05:17 PM IST

'कधी त्याचे गाल पकडत आहे तर कधी..., बाहेर करा हे सर्व' कपलच्या त्या कृत्यावर भडकली महिला, मेट्रोतील VIDEO VIRAL
Delhi metro video viral: गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो (Delhi Metro) तील व्हिडिओ समोर येत आहेत. मेट्रोत कधी कुणाचा वाद झाल्याचा, कधी भांडणाचा तर कधी कुणी परिधान केलेल्या कपड्यांवरुन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला कपलवर चांगलीच संतापल्याचं दिसून येत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या... (Video Viral in Social Media)
कधी केसांना हात लावतेय तर कधी गाल पकडतेय...
व्हायरल होणारा हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील आहे. मेट्रोतून प्रवास करताना एक महिला दाम्पत्यावर चांगलीच संतापली. दाम्पत्याच्या कृत्यावरुन ही महिला त्यांना झापत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वयोवृद्ध महिला मेट्रोतील कपला ओरडत आहे. "तू त्या मुलासोबत काय करत आहे... कधी केसांना हात लावत आहे तर कधी गालाला हात लावत आहे... इतर माणसे सुद्धा इथे आहेत पण कुणीच काही बोलत नाहीये.."

चांगले वाटत नाही बेटा...
महिला बोलत असताना त्या कपलमधील मुलीने सुद्धा त्या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. तुम्हाला काही त्रास आहे का? असा सवाल या मुलीने विचारला. यावर महिलेने म्हटलं, "हे चांगले वाटत नाही, रोमान्स करायचा असेल तर बाहेर जाऊन करा". मेट्रोतील हा वाद पाहून इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत वयोवृद्ध महिला आणि या कपलला समजावत शांत करण्याचा प्रयत्न केला.
मेट्रोतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसेच या घटनेवर युजर्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या महिलेचं समर्थन केलं आहे. तसेच रोमान्स करायचा असेल तर खासगी जागेत करायला हवा असे म्हटलं. तर काहींनी या कपलचा बचाव केल्याचं पहायला मिळत आहे.
मेट्रोतील विविध घटनांचे व्हिडिओ व्हायरल
मेट्रोत होणाऱ्या विविध घटनांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून जोरदार व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात दोन महिला सीटवर बसण्यावरुन एकमेकींसोबत वाद घालतात. हा वाद इतका वाढतो की, एक महिला अपशब्द सुद्धा वापरते.
ताज्या बातम्या
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited