Jun 27, 2022
आझमगढ जागेतून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव निरहुआनं विजय मिळवला आहे.
Credit: Instagram
निरहुआने आपले विरोधक सपाचे धर्मेंद्र यादवला 8679 मतांनी पराभूत केलं. हे दुसरी वेळ होती की, निरहुआ आझमगढातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला होता.
Credit: Instagram
अभिनेता , गायक आणि संगीतकार मनोज तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात मोठं नाव आहे. ते आता सक्रीय राजकारणात आले आहेत.
Credit: Instagram
मनोज तिवारी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून लोकसभा खासदार झाले. ते दिल्लीच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहीले आहेत.
Credit: Instagram
रवि किशन सक्रिय राजकारणात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर ते गोरखपूर लोकसभा जागेतून भाजपचे उमेदवार बनले आणि खासदार झाले.
Credit: Instagram
भोजपुरी चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या नावाने प्रसिद्ध असलेली नगमा 2004 मध्ये काँग्रेस पक्षासह राजकारणात आली आहे.
Credit: Instagram
2007 मध्ये काँग्रेसद्वारे आंध्र प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेतून नगमाच्या नावाची शिफारस करण्यात आली. तर 2014 मध्ये मेरठमधून तिने निवडणूक लढवली आणि पराभूत झाली.
Credit: Instagram
भोजपुरी चित्रपटाचे अभिताभ बच्चन कुणाल सिंहने 2014 मध्ये काँग्रेसचे तिकीट घेऊन निवडणूक लढवली होती.
Credit: Instagram
संजय यादवने 2015मध्ये राजकारणात पाऊल ठेवले. आरजेडी म्हणजेच राष्ट्रीय जनता दलच्या तिकीटावरुन निवडणूक लढवून ते आमदार झाले.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा