अथिया-केएल राहुलच्या लग्नाचे खास फोटो

Bharat Jadhav

Jan 24, 2023

23 जानेवारीला घेतले सात फेरे

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकली आहे. त्या दोघांनी 23 जानेवारी रोजी सात फेरे घेतले.

Credit: insta/athiyashetty

लग्नानंतरची पहिली झलक

लग्नानंतर वधू-वरांची पहिले फोटो आता माध्यामांसमोर आली आहेत. अथिया आणि केएल राहुलने लग्नानंतरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Credit: insta/athiyashetty

मस्त लिहिलं आहे कॅप्शन

अथिया आणि केएल राहुलने फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंसोबत एक मस्त कॅप्शन लिहिले आहे. दोघेही लिहितात- तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले.

Credit: insta/athiyashetty

खंडाळामध्ये केलं लग्न

कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे की, 'आज, आमच्या प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत, आम्ही त्या घरात लग्न केले ज्याने जेथे आम्हाला सर्वात आनंद आणि शांती मिळाली.'

Credit: insta/athiyashetty

आशीर्वाद मागितले

अथिया आणि केएल राहुल यांनी कृतज्ञता आणि प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. नवीन जीवन प्रवासासाठी सर्वांचे आशीर्वाद मागितले.

Credit: insta/athiyashetty

माध्यमांना म्हटलं Thank You

लग्नानंतर सांयकाळी उशिरा नवरदेव केएल राहुल आणि नवरी अथिया शेट्टी हे दोघेही माध्यमांसमोर आले. त्यांनी फोटोसाठी पोझ दिल्या. फोटो काढले आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.

Credit: insta/athiyashetty

या वेळेत घेतले सात जन्मांचे वचन

सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अथिया आणि केएल राहुल यांनी सात फेरे घेत एकमेंकांना सात वचन दिली.

Credit: insta/athiyashetty

प्रायव्हेट समारंभात झाला लग्नसोहळा

लग्न अतिशय खाजगी होते, फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

Credit: insta/athiyashetty

'आता मी सासरा झालोय'

याआधी सुनील शेट्टीने लग्न आटोपताच लग्नस्थळाबाहेर पपाराझींची भेट घेऊन सर्वाना मिठाई दिली. त्यावेळी सुनिल अण्णा म्हणाले - आता मी सासरा झालो.

Credit: insta/athiyashetty

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सुनिल शेट्टीचे महालासारखे फार्महाऊस

अशा आणखी स्टोरीज पाहा