थंड पाणी पिऊन सपना चौधरी झाली स्लिम ट्रिम!

May 24, 2023

Pallavi Shivle

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि हिंदी बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून झळकलेली सपना चौधरी हिचे अनेक चाहते आहेत.

Credit: Facebook

तिचे गाणी आणि डान्स मूव्ह्स आजही खूप प्रसिद्ध आहेत, जे प्रत्येक लग्न आणि पार्टीमध्ये पाहायला मिळतात.

Credit: Facebook

सपना चौधरीचे काही वर्षांपूर्वी वजन खूप जास्त होते. त्यामुळे तिच्या या Fat to Fit ट्रान्सफॉर्मेशनबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांना आहे.

Credit: Facebook

एकदा तिला जेव्हा तिच्या वाढलेल्या वजनामुळे स्टेज परफॉर्मन्सदरम्यान दम लागू लागला तेव्हा तिने तिचे वजन कमी करण्याचे ठरवले.

Credit: Facebook

सपनाने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, तिने वजन कमी करण्यासाठी खूप कडक डाएट फॉलो केले होते.

Credit: Facebook

तिच्या डान्स परफॉर्मन्सदरम्यान तिला सलग २ तास स्टेजवर राहून डान्स करावा लागायचा.

Credit: Facebook

त्यामुळे तिने आपली फिगर टोन करण्यासाठी आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी कठोर व्यायाम सुरू केला.

Credit: Facebook

सपना बहुतेकवेळा जिममध्ये जात असे, ज्यामध्ये ती तिच्या आवडीचे वर्कआउट करत असे.

Credit: Facebook

वर्कआउट्स व्यतिरिक्त, कोणतेही कार्यक्रम नसतानाही ती दररोज नृत्याचा सराव करत असे, जो कॅलरी बर्न करण्याचा एक चांगला मार्ग होता.

Credit: Facebook

सपनाला थंड पाणी प्यायला आवडते आणि वजन कमी करण्याच्या कार्यात ती नेहमी थंड पाणी प्यायची.

Credit: Facebook

सपनाचा दिवस एक ग्लास लिंबू पाणी किंवा गरम हर्बल चहाने सुरू व्हायचा ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत मिळाली.

Credit: Facebook

नाश्ता आणि दुपारच्या जेवणात तिने चहा सोडला होता, त्याऐवजी ती नारळपाणी किंवा फळे घ्यायची.

Credit: Facebook

नाश्त्यासाठी, सपना पांढऱ्या ब्रेडच्या जागी मल्टीग्रेन ब्रेड आणि मोड आलेले धान्य खाते. तसेच अंड्याचा पांढरा भाग खायची.

Credit: Facebook

दुपारच्या जेवणात सपनाला हिरव्या भाज्या किंवा काही शेंगा खायला आवडत असे, त्यामुळे तिला काही प्रमाणात प्रथिनेही मिळत होती. रात्रीच्या जेवणात ती तेच खायची.

Credit: Times Network

सपना रात्री साडेसातच्या आधीच जेवण उरकायची.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: टॉप 10 रोमँटिक कोरियन ड्रामा सिरीज

अशा आणखी स्टोरीज पाहा