Priyanka Deshmukh
May 25, 2023
आपला आवडता बॉलीवूड रोम-कॉमच्या चित्रपटांचा निर्माता करण जोहरचा आज वाढदिवस आहे.
Credit: Instagram
करणला अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींवर प्रतिक्रिया आणि द्वेषपूर्ण टिप्पण्यांचा सामना करावा लागला. त्याने या दरम्यान चिंतेशी कसा सामना केला ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Credit: Instagram
कॉफी विथ करणचा 7 वा सीझन सुरू आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे या शोला खूप पसंती दिली जात आहे. या शोचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. या शोमध्ये अनेकदा मोठे खुलासे होतात. यावेळी शोमध्ये करण जोहरने त्याच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Credit: Instagram
या एपिसोडमध्ये करण त्याच्या मानसिक आरोग्याविषयी आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मोकळेपणाने बोलतो. त्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी जेव्हा ट्रोलर्सने त्याच्या मुलांवर कमेंट केली तेव्हा तो anxiety चा शिकार झाला होता ज्यासाठी त्याला थेरपी घ्यावी लागली होती.
Credit: Instagram
'यादरम्यान मी लोकांशी या वस्तुस्थितीबद्दल बोलण्यास सुरुवात केली कारण मी लोकांना हे देखील सांगत नव्हतो की मी थेरपी घेत आहे आणि मी 3 किंवा 4 वर्षांपासून चिंतेच्या समस्येतून जात होतो', असे करणने सांगितले.
Credit: Instagram
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मकतेचा कसा सामना करतो? यावर उत्तर देताना करण म्हणाला की, 'मी इतक्या वर्षांत स्वत:ला असे तयार केले की आता मला या सर्व गोष्टींचा काही फरक पडत नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही.
Credit: Instagram
'कधी कधी लोक इतके खालच्या थराला जातात की ते माझ्या मुलांनाही शिव्या देवू लागतात त्यावेळी मला खूप वाईट वाटतं. लोकांना माझी लैंगिकता किंवा माझ्याबद्दल जे काही वाईट बोलायचे आहे ते मला बोला अशी विनंतीही करणने ट्रोलर्सना केली.
Credit: Instagram
5 वर्षांपूर्वी चिंतेशी लढत होतो. मी याबद्दल कधी उल्लेखही केला नाही. याविषयी मी माझ्या मानसशास्त्रज्ञाशी बोललो तेव्हा ती म्हणाली की तुम्ही सगळ्यांसोबत आपलं दु:ख किंवा मनातील भावना शेअर करा.
Credit: Instagram
या सगळ्याचा आपण खूप विचार करतो आपल्या भावना मनात दाबून ठेवतो त्याला वाट मोकळी करून देत नाही म्हणून आपण नैराश्यात जातो. मी असे केले नाही. माझ्या डॉक्टरांचा सल्ला ऐकला आणि माझ्या मनातील गोष्टी जवळच्या मित्र मैत्रिणींशी शेअर करायला लागलो.
Credit: Instagram
डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी लोकांशी याबद्दल बोलू लागलो. तेव्हापासून मला थोडे बरे वाटते आणि मी त्याबद्दल अधिकाधिक बोलतो. आता मी माझ्या anxiety वर मात केली आहे. आता मला कशाचीही भिती वाटत नाही असे करणे सांगितले.
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद