Nov 24, 2022

BY: Bharat Jadhav

​सोनाक्षीने 30 तर झरीनने घटवलं 43 किलो वजन, जाणून घ्या अभिनेत्रींचा डाएट

​अभिनेत्रींनी वाढवलं अन् घटवलं वजन

बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या भूमिकेनुसार ट्रांसफॉर्मेशन करावे लागते. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या भूमिकेसाठी आपले वजन वाढवले आणि नंतर ते वेगाने कमी केले आहे.

Credit: Instagram

​जाणून घ्या वेट लॉस सीक्रेट

वजन कमी करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री काय खातात कोणता आहार घेतात याचा कधी विचार केला आहे का? बॉलिवूड अभिनेत्रींचे वजन कमी करण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर पुढे वाचा..

Credit: Instagram

​सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे 30 किलो वजन कमी केले होते. वजन कमी करण्यासाठी तिने जंक फूड, कार्ब्स आणि मिठाई खाणे बंद केले.

Credit: Instagram

​डाएट प्लान

आजही सोनाक्षी संध्याकाळी 6 नंतर कार्ब खात नाही. ग्रीन टी, गव्हाचे टोस्ट, दूध, ओट्स, घरगुती ब्रेड, भाज्या, पनीर, मसूर, चिकन आणि मासे यांचा आहारात समावेश केला आहे.

Credit: Instagram

​भूमी पेडणेकर

पहिल्या सिनेमानंतर भूमी पेडणेकरने तिचे 30 किलो वजन कमी केले होते. तिने आता एब्स मिळवले आहेत.

Credit: Instagram

​काय आहे डाएट प्लान

भूमीने घरी शिजवलेले अन्न, स्मूदी, ड्रायफ्रुट्स, फळे, तृणधान्ये,आणि हिरव्या भाज्यांचा आपल्या आहारात डाएटमध्ये समावेश केला होता. तर दारूपासून दूर राहिली होती.

Credit: Instagram

​परिणीती चोप्रा

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी परिणीती चोप्राचे वजन 86 किलो होते, पण आता ती खूप फिट आहे. वजन कमी करण्यासाठी त्याने हेल्दी डाएट-वर्कआउट रूटीन फॉलो केले आहे.

Credit: Instagram

​परिणीतीचा डाएट

परिणीती आहारात अंड्याचा पांढरा, ब्राऊन ब्रेड, ज्यूस ब्राऊन राइस, सॅलड, हिरव्या पालेभाज्या खात असायची. याशिवाय ती रात्री चॉकलेट शेक किंवा कमी कॅलरी जेवण घेत असे.

Credit: Instagram

​सारा अली खान

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सारा अली खानचेही वजन खूप जास्त होते पण आता ती खूप फिट आहे.

Credit: Instagram

​असं कमी केलं वजन

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवली म्हणजेच व्यायाम सुरू केला तसेच घरचे खाणे तिने सुरू केले आहे. यामुळे त्याचे वजन कमी झाले होते.

Credit: Instagram

​झरीन खान

झरीन खानचे वजन एकेकाळी 100 किलो होते आणि तिने 43 किलो वजन कमी केले. यासाठी तिने आहार आणि शारीरिक हालचालींकडे लक्ष दिले.

Credit: Instagram

​असा आहे डाएट

झरीनने आहारात घरगुती अन्न, संपूर्ण धान्य, सलाद, पनीर, चिकन, मासे, दही, नट्स यांचा समावेश केला. तीही रोज तूप खात असे.

Credit: Instagram

​काय करावं

तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर प्रमाणित ट्रेनरचा सल्ला घेऊन फिटनेसचा प्रवास सुरू करा.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रिअल लाईफ खूप हॉट आहे अजय देवगनची ऑनस्क्रीन मुलगी

अशा आणखी स्टोरीज पाहा