​वयाच्या 71 व्या वर्षी झीनतला आवडते खिचडी लोणचं​

Priyanka Deshmukh

May 27, 2023

​सर्वात सुंदर अभिनेत्री​

अभिनेत्री झीनत अमान तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या सौंदर्याचे आणि बोल्डनेसचे चाहते वेडे झाले होते.

Credit: Instagram

स्तनांच्या आरोग्यासाठी सर्व महिलांनी करावा या योगासनांचा सराव

सौंदर्याचे आणि बोल्डनेसचे चाहते वेडे

वयाच्या 71 व्या वर्षीही झीनतची फॅन फॉलोइंग कमी नाही. प्रत्येकाला झीनतच्या सौंदर्याचे रहस्य तर जाणून घ्यायचे असतेच पण ती काय खाते आणि ती कशी जगते हे देखील जाणून घ्यायचे असते.

Credit: Instagram

​स्नॅक्स प्रेमी​

झीनतने अलीकडेच खुलासा केला आहे की ती सामान्य देसी लोकांसारखीच आहे आणि ती तिच्या बेडरूममध्ये स्नॅक्स ठेवण्यास विसरत नाही.

Credit: Instagram

​देसी रेस्टॉरंट्स​

यासोबतच लंच आणि डिनरमध्ये तिला काय खायला आवडते आणि कोणत्या गोड पदार्थाला ती कधीच नाही म्हणू शकत नाही हे देखील सांगितले. ती परदेशात असते तेव्हा तिला तिथेही देसी रेस्टॉरंट्स दिसतात.

Credit: Instagram

​इंस्टाग्राम फॅन्स​

झीनत अमानने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती जुन्या लूक मध्ये दिसत आहे.

Credit: Instagram

​वेस्टर्न ग्लॅम​

तुम्ही मला 'वेस्टर्न ग्लॅम'शी जोडू शकता पण मी देसी आहे आणि ते माझ्या आहारात दिसून येते. मी जगात कुठे फिरत आहे याने काही फरक पडत नाही, दोन दिवसातच मला घरच्या जेवणाची इच्छा होते आणि भारतीय रेस्टॉरंटच्या शोधात मी बाहेर पडते, असे झीनतने सांगितले.

Credit: Instagram

​कंफर्ट फूड खिचडी

डाळ भात हे माझे मुख्य अन्न आहे आणि खिचडी हे माझे कंफर्ट फूड आहे. मी दुपारच्या जेवणासाठी पापड आणि लोणचे खाते, दक्षिणायनचा डोसा हा माझा आवडता पदार्थ आहे. आणि काजू कतली झीनतला खूप आवडते असे तिने स्वत: सांगतिले.

Credit: Instagram

​भारतीय पदार्थाच्या शोधात​

झीनत अमानने तिच्या पोस्टमध्ये चाहत्यांकडून सल्ला सांगितले की, ती अजूनही काही भारतीय पदार्थ शोधत आहे.

Credit: Instagram

स्थानिक पदार्थ आवडतात​

​मी शाकाहारी आहे त्यामुळे तुम्ही तुमचे स्थानिक आवडते पदार्थ शेअर करा जेणेकरून मी त्याचा आस्वाद घेवू शकेन, असे कॅप्शन झीनतने आपल्या पोस्ट ला दिले आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​अंकिता लोखंडे प्रेग्नंट? Photo व्हायरल होताच चर्चेला उधाण

अशा आणखी स्टोरीज पाहा