​हिवाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी आणि त्वचा ग्लो करण्यासाठी 5 पेये

Bharat Jadhav

Nov 24, 2022

​हिवाळ्यात असते ही समस्या

हिवाळ्यातील सामान्य तक्रारी म्हणजे कोरडी आणि निस्तेज त्वचा आणि हिवाळ्यात हायड्रेशन किती महत्वाचे आहे हे आपण विसरून जातो.

Credit: Pexels

​काय त्रास जाणवतो

हे झाल्यास चयापचय कमी होणे, आळशीपणा जाणवणे, डोकेदुखी, थकवा आणि अनियमित आतडी होऊ शकते. तसेच आपली त्वचा ही ग्लो करत नाही.

Credit: Pexels

​आहारात बदल करणे गरजेचे

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे गरजेचे असते. विशेष करून आपली त्वचा निरोगी राहावी यासाठी विविध पेयांचा समावेश केला पाहिजे. याचा फायदा त्वचेसाठी देखील होतो.

Credit: Pexels

​हिरव्या भाज्यांचा ज्यूस

विविध भाज्यांचा वापर करून सूप बनवता येते. या सुपाचा हिवाळ्यात खूप फायदा होतो. हिवाळ्यात हिरव्या भाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. हिरवा भाजीपाला आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळेच या हिरव्या भाज्यांचा ज्यूसमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Credit: Pexels

​काय होतो फायदा

यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे मोठ्या प्रमाणात मिळतात. तुमची रोगप्रतिकारक्षमतादेखील यामुळे वाढते. शिवाय यामुळे त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. हा भाज्यांचा रस तुम्ही दररोज घेऊ शकता.

Credit: Pexels

​लिंबू पाणी

पचनास मदत करण्यासाठी, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी एक ग्लास लिंबूपाणी आपल्या आहारात समाविष्ट करा. व्हिटॅमिन सीचे हे स्त्रोत असून ते हायड्रेटेड राहण्याचा एक मार्ग आहे.

Credit: Pexels

​हळदीचे दूध

हळदीच्या दूधाचे महत्त्व तर आयुर्वेदातदेखील सांगितले आहे. दूधात कॅल्शियम आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात. तर हळद अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असते. त्यामुळे आरोग्यासाठी हळदीच्या दूधाचे मोठे फायदे असतात.

Credit: Pexels

​हर्बल टी

चहा पिताना हर्बल चहा प्यायल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. शिवाय यातून आरोग्याचे फायदेदेखील मिळतात. हर्बल चहा प्यायल्याने रात्री झोपही चांगली येते. तणाव दूर होत असतो. हर्बल चहामध्ये हिबिस्कस चहा, पेपरमिंट चहा आणि आल्याचा चहा इत्यादींचा समावेश असतो.

Credit: Pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पायाचे टॅनिंग कसे दूर कराल?