May 24, 2023

​जेवण तयार झाल्यावर मीठ टाकणे कितपत योग्य?​

Sunil Desale

​मिठाशिवाय जेवण​

कोणत्याही अन्नपदार्थांची चव वाढवण्यात मीठ हा महत्त्वाची भूमिका बजावतो. जेवणात मीठ नसेल तर जेवणाला चवच लागत नाही.

Credit: pexels

​जेवण तयार झाल्यावर त्यावर मीठ​

सर्व पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण हे योग्य असावे. पण जेवण तयार झाल्यावर त्याच्यावर तुम्ही मीठ टाकत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही. कारण, हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

Credit: pexels

​मीठ वगळता येणार नाही​

शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी, तणाव, नैराश्य दूर करण्यासाठी मीठ हे महत्त्वाचे आहे.

Credit: pexels

​कोलेस्ट्रोल पातळी वाढण्याचा धोका​

जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पण मिठाचे प्रमाण कमी केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. स्नायू कडक होणे, चक्कर येणे, भूक न लागणे आणि रक्तदाब कमी होण्यासारख्या समस्या सुद्धा भेडसावण्याची शक्यता आहे.

Credit: istock

​मीठ खाण्याचे तोटे​

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने केस गळती, हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब, स्ट्रोक यासारख्या समस्या भेडसावण्याची शक्यता आहे

Credit: istock

​दिवसभरात किती मीठ​

निरोगी व्यक्तीने एका दिवसभरात एक टी स्पून मीठ खावे. कारण, तुम्हाला दिवसात केवळ 2.3 ग्रॅम सोडियम खाण्याची गरज आहे आणि हे 5 ग्रॅम मिठात सुद्धा असते

Credit: istock

​जेवण तयार झाल्यावर मीठ टाकणे किती धोक्याचे?​

जेवण तयार झाल्यावर त्यावर तुम्ही मीठ टाकल्यास रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास तसेच किडनीच्या संबंधित आजार होऊ शकतात.

Credit: pexels

​सवय​

तुम्ही एक-दोन वेळा जेवणावर अधिक मीठ टाकून खाल्ले तर तुम्हाला ती सवय लागते. त्यानंतर अशाप्रकारे जेवणावर मीठ घेतल्याशिवाय तुम्ही जेवत नाहीत.

Credit: istock

​सैंधव मीठ​

पूर्वी केवळ उपवास असल्यावर सैंधव मीठ वापरत असत मात्र, आता दररोजच्या जेवणातही सैंधव मीठ वापरले जाते. कारण यामध्ये लोहाचे प्रमाण सर्वात कमी असते.

Credit: pexels

​कसे कंट्रोल करावे?​

जेवणात मर्यादित प्रमाणात मीठ टाकण्यास सुरुवात करा. खारट पदार्थांचे सेवन कमी करा.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या सवयी सोडल्या नाही तर होईल कॅन्सर, तुम्हाला तर नाहीयेत ना?

अशा आणखी स्टोरीज पाहा