या आयुर्वेदिक गोष्टींनी वाढवा पचनशक्ती

Prashant Jadhav

May 25, 2022

योग्य पचन

खराब पचनामुळे अनेक आजार शरीराला घेरतात. चला जाणून घेऊया अशा आयुर्वेदिक गोष्टींबद्दल ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होऊ शकते.

Credit: pexels

​बडीशेप

बडीशेपच्या पाण्याच्या नियमित सेवनाने पोटदुखी दूर होते. याशिवाय पचनक्रियाही व्यवस्थित राहते.

Credit: pexels

​धणे

धण्यांचा थंड प्रभाव असतो. याचे सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होते. यासोबतच गॅस आणि अॅसिडिटी दूर राहते.

Credit: freepik

​त्रिफळा

एक चमचा त्रिफळा चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घ्या. पचनसंस्था मजबूत होईल.

Credit: iStock

​कोरफड

कोरफडीचा गर पाण्यात विरघळवून प्यायल्याने पोटदुखी, सूज येणे आणि अल्सरपासून आराम मिळतो.

Credit: istock

​हळद

कोमट पाण्यात हळद मिसळून प्या. अँटिबायोटिक गुणधर्माने समृद्ध हळद पोटाला आजारांपासून मुक्त करते.

Credit: freepik

​आलं

आले ठेचून खा किंवा चहा बनवून प्या. याचे सेवन केल्याने गॅस, अपचन यांसारख्या समस्या होत नाहीत.

Credit: freepik

​लिंबू

व्हिटॅमिन-सीने समृद्ध लिंबाचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

Credit: pexels

​वेलची

रात्री झोपण्यापूर्वी किंवा रिकाम्या पोटी वेलचीचे सेवन करा. पोटदुखी, अपचनाचा त्रास होणार नाही.

Credit: freepik

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वेट लॉससाठी दर दिवसाला किती कॅलरी गरजेची आहे ?