कडू-कडू कारल्याचे आहेत गोड-गोड आरोग्यदायी फायदे

Bharat Jadhav

Feb 18, 2023

आजारांपासून संरक्षण

कारले चवीला कडू असते. त्यामुळे बहुतेकांना ते खायला आवडत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का की, कारल्याच्या सेवनाने अनेक आजार आणि संक्रमणांपासून बचाव होतो.

Credit: i-stock

पोषक तत्व

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज कॅरोटीन आणि बीटा कॅरोटीन यांसारखे घटक आढळतात.

Credit: i-stock

साखरेची पातळी नियंत्रित ठेवते

डायबेटिक विरोधी गुणधर्मामुळे, कारले शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवत असते.

Credit: i-stock

डोळ्यांसाठी फायदेशीर

कडू कारले डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारखे घटक असतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.

Credit: i-stock

त्वचा ठेवते निरोगी

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कारल्याचा रस हा उत्तम पर्याय आहे. कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

Credit: i-stock

यकृत ठेवते स्वच्छ

कारल्याचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Credit: i-stock

रक्तदाब नियंत्रित करते

कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Credit: i-stock

इम्यूनिटी करते मजबूत

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध कारल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत असते.

Credit: i-stock

कारल्याचा रस कधी प्यायचा नाही

गरोदर स्त्रिया आणि हृदयासंबंधी काही आजार असेल तर कारल्याचा रस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे Indian superfoods

अशा आणखी स्टोरीज पाहा