Mar 9, 2023

BY: Sunil Desale

​सकाळी हे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर मिळेल एनर्जी अन् उत्साह

नाश्त्यात काय खावे?

नाश्ता चांगला केल्यास तुमच्या दिवसाची सुरुवातही चांगली होते. त्यासाठी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये निरोगी आहाराचा समावेश असणे आवश्यक आहे. जे तुमच्या शरीराला दिवसभर फ्रेश ठेवेल आणि ऊर्जा देईल.

Credit: pexels

​ओट्स​

ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. नाश्त्यात याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि यामुळे ब्लोटिंग, गॅस किंवा अपचनाची समस्या दूर होते.

Credit: pixabay

​अंडे​

अंडे हे प्रोटीनचा खजिना आहे आणि एक परफेक्ट ब्रेकफास्ट आहे. अंडी उकडून किंवा ऑमलेट बनवून खाऊ शकता.

Credit: pixabay

​पोहे​

कमी खाऊन जास्तवेळ पोट भरलेले ठेवायचे असल्याच हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे चरबी सुद्धा वाढत नाही. तसेच झटपट तयारही होतात.

Credit: i-stock

​केळी​

केळी हे पोटॅशियम, मॅग्नेशियमसोबतच व्हिटॅमिनचा एक चांगला सोर्स आहे. केळी तुमच्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Credit: pixabay

​उकडलेल्या भाज्या

दिवसाची सुरुवात उकडलेल्या भाज्यांनी सुद्धा करु शकता. यामध्ये काळे मीठ, काळी मिरची पावडर आणि जिरे-हिंग याचा तडका सुद्धा लावू शकता.

Credit: pixabay

​चणे​

10 ग्रॅम चण्यांमध्ये कमीत कमी 15 ग्रॅम प्रोटीन असते. तुम्ही चणाचाट किंवा भिजवलेले कच्चे चणे खाऊ शकता.

Credit: pixabay

​ग्रीन ज्यूस

व्हीटग्रास आणि मोरिंगा यापासून बनवलेला ज्यूस घेऊन दिवसाची सुरुवात करा. हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

Credit: pixabay

​ड्रायफ्रूट्स

दिवसभरात लागणारी थोडी-थोडी भूक पूर्ण करण्यासाठी ड्रायफ्रूट्स खा. यामुळे डोळे, केस आणि त्वचेला फायदा होतो.

Credit: pixabay

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गोरे होण्यासाठी खास घरगुती टिप्स

अशा आणखी स्टोरीज पाहा