हात, पाय आणि चेहऱ्यापेक्षा अंडरआर्म्सचा रंग जास्त गडद असतो. घाम येणे आणि रसायनिक पदार्थांचा जास्त वापर करणे हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जाते.
Credit: istock
बेकिंग सोडा
अंडरआर्म्सचा काळपटा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. बेकिंग सोड्यत चिमूटभर हळद टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा आणि कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.
Credit: istock
बटाट्याने मालिश
बटाट्यात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. त्यामुळे तुम्ही बटाट्याच्या पातळ कापांनी काळपट अंडरआर्म्सचा मसाज केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
Credit: pexels
तुरटी
तुरटीत असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म काळ्या अंडरआर्म्सपासून आराम मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. तुरटीत थोडे पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट 10 मिनिटे लावून मग थंड पाण्याने धुवा.
Credit: istock
साखर
अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी मध-लिंबू आणि साखरेचा स्क्रब खूप प्रभावी आहे. या स्क्रबचा वापर केल्याने अंडरआर्म्सची डेड स्किन निघून ती स्वच्छ होते.
Credit: istock
मुलतानी माती
मुलतानी मातीचा वापर त्वचेला चमकदार बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातो. मुलतानी माती मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून त्वचा स्वच्छ करते. यामुळे अंडरआर्म्सचा काळपटपणा कमी होतो.
Credit: istock
खोबरेल तेल
खोबरेल तेल हे त्वचेला उजळ करणाऱ्या व्हिटॅमिन ई साठी ओळखले जाते. खोबरेल तेल अंडरआर्म्ससाठी खूप फायदेशीर आहे. काळपटपणा असलेल्या भागाला खोबरेल तेलाने मसाज करा आणि 15 मिनिटांनंतर धुवा.
Credit: istock
You may also like
चिकू खाण्याचे असंख्य फायदे, मिळेल जबरदस्...
खरबूजचे अद्भूत फायदे, त्वचेसाठी वरदान ठर...
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल अंडरआर्म्सचा रंग सुद्धा बदलू शकते. ऑलिव्ह ऑईलमध्ये एक टेबलस्पून ब्राऊन शुगर मिसळा आणि दोन मिनिटे स्क्रब करा. ही पेस्ट सुकल्यावर थंड पाण्याने धुवा.
Credit: istock
टी-ट्री ऑईल
काळ्या अंडरआर्म्सपासून सुटका करण्यासाठी टी ट्री ऑईल हे उत्तम तेल आहे. एनसीबीआयच्या वेबसाईटवर प्रकाशित एका रिसर्चनुसार, टी ट्री ऑईलमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे जंतूंशी लढण्यास मदत करतात.
Credit: istock
कोरफड
अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. एलोवेरा जेल अंडरआर्म्सच्या काळपटणा असलेल्या भागावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे ठेवा. मग काही वेळाने ते धुवा.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: चिकू खाण्याचे असंख्य फायदे, मिळेल जबरदस्त ऊर्जा