Mar 18, 2023

हे उपाय करा आणि Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करा

Rohan Juvekar

कोणालाही येऊ शकतो Heart Attack

बदललेल्या जीवनशैलीमुळे कोणालाही कोणत्याही वयात Heart Attackयेण्याचा धोका आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

Credit: Times Network

सुष्मिता सेन

अलिकडेच सेलिब्रेटी सुष्मिता सेन हिला पण heart attack आला होता

Credit: Times Network

heart attack ची प्रमुख लक्षणे

सतत छातीत वेदना होणे, अंगदुखी, गुडघेदुखी, खांदादुखी, अस्वस्थ वाटणे, खूप घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत ​heart attack ची प्रमुख लक्षणे​

Credit: Times Network

धावाल तर जगाल

Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी दररोज किमान 1 तास वेगाने चालणे अथवा धावणे हिताचे. इतर शारीरिक व्यायाम, योगासने करणे पण लाभदायी ठरू शकते.

Credit: Times Network

वैद्यकीय सल्ला

हृदयाची काळजी घेण्यासाठी अनुभवी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करणे फायद्याचे. आहारात ताजी फळे, ताज्या भाज्या, दूध, डाळी यांचा समावेश करावा. हिरव्या भाज्या खाण्यावर भर द्यावा.

Credit: Times Network

व्यसने टाळावी

धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन, पान खाणे, तंबाखू खाणे, मावा खाणे, गुटखा खाणे, सतत चहा वा कॉफी पिणे अशा प्रकारची शरीराला घातक असलेली सर्व व्यसने टाळावी

Credit: Times Network

रक्तातील साखर

रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. दररोज संध्याकाळी 7च्या आधी रात्रीचे जेवण जेवून घ्या. रात्री 9 किंवा 10 वाजेपर्यंत झोपून जा. रात्रीची झोप किमान 6 ते 8 तास घेणे हिताचे.

Credit: Times Network

रक्ताभिसरण

मर्यादीत प्रमाणात हळद, द्राक्ष, सफरचंद, जांभूळ, मासे, ताज्या भाज्या, ताजी फळे, हिरव्या भाज्या, बदाम, पांढरा कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करावा. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पांढरा कांदा खाण्याचे फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा