Feb 27, 2023
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी लो सोडियम असलेले पदार्थ खाणे हिताचे
Credit: Times Network
रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहिले तर हृदयाचे आरोग्य उत्तम राहते
लो सोडियम पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहील.
ताज्या भाज्या आणि ताजी फळे खा. हिरव्या भाज्या, पालेभाज्या खाण्यावर भर द्या. हृदयाचे आरोग्य उत्तम राहील. यातही सफरचंद, पपई, केळी खाणे फायद्याचे.
बटाट्यांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. पण पोटॅशियम भरपूर असते. यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी मर्यादीत बटाटे खाणे हिताचे
दररोज मर्यादीत ताजी फळे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते
दही शरीराला ऊर्जा देते तसेच अन्न पचनास मदत करते. दररोज मर्यादीत प्रमाणात दह्याचे सेवन हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी लाभदायी आहे.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी दररोज मर्यादीत प्रमाणात सुकामेवा, शेंगदाणे, खाणे हिताचे
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद