​वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ आहेत फायद्याचे

Bharat Jadhav

Jun 15, 2022

​कमी नाही योग्य खा

जर वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारातून वाईट अन्न काढून टाकणे आणि योग्य आहाराचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

Credit: Pexels

साखर नाही मध खावं

साखरेमध्ये फक्त कॅलरीज असतात. तर मधामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते.

Credit: Pexels

​तेप खा

तेलाऐवजी देशी तुपाचा आहारात समावेश करावा त्यात व्हिटॅमिन के, ए, ई, डी, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 असतात. वजन कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे.

Credit: Pexels

​स्मूदी

आईस्क्रीम ऐवजी फळे आणि दही घालून स्मूदी बनवा, त्यात साखरेऐवजी मध घाला.

Credit: Pexels

​घरगुती पेय

यात तुम्ही भाज्यांचा ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी आणि लस्सीचे सेवन करु शकता, कोल्डिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सपासून दूर रहा.

Credit: Pexels

​फळे खा

ज्यूस न करता फळांचे सेवन करावे. फळांमधून फायबरही मिळेल आणि शुगर लेव्हलही नियंत्रित राहील. ज्यूसमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे.

Credit: Pexels

​सैंधव मीठ

पांढऱ्या मिठाऐवडी सैंध्या मीठाची निवड करा. त्यात पटॅशिअम, लोह, आयोडिन, कॅल्शिअम असते, जे वजन कमी करण्यासोबतच निरोगी राहण्यासही मदत करते.

Credit: Pexels

​संपूर्ण धान्य

यात तुम्ही ब्राउन राइस, ओट्स खाउ शकतात, त्यात फायबर असते. पांढरा ब्रेड, पांढरा भात आणि पांढरा फास्ता टाळा.

Credit: Pexels

स्नॅक्समध्ये नट्स हवे

स्नॅक्स म्हणून तुम्ही तळलेले पदार्थ खाऊ नका. या पदार्थांऐवजी तुम्ही काजू , बदाम, बेदाणे, आक्रोड बेडाणे इत्यादी खा. यात कॅलरीज कमी असतात.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वजन कमी करण्यासाठी खाऊ नका हे पदार्थ