पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे Indian superfoods

Bharat Jadhav

Feb 18, 2023

चिंच

गोड-आंबट चिंच हायड्रॉक्सीसिट्रिक ऍसिड किंवा एचसीएने भरलेली असते. ज्यामुळे भूक कमी होते. चिंच खाल्ल्याने वजन कमी होतं असते. हे सेरोटोनिनचे प्रकाशन देखील वाढवते.

Credit: Times-Network

पिस्ता

पिस्ता हा कमी-कॅलरी नट्स आहे, जे प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 ने भरलेला असते. पिस्ता वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त आहे.

Credit: Times-Network

दही

दही किंवा दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेचे नियमन करतात आणि चयापचय वाढवतात. याचा परिणाम, वजन कमी करण्याची प्रक्रिया सुधारते. दह्यामधील प्रथिनांचे प्रमाण जास्त काळ पोटभरुन ठेवत असते.

Credit: Times-Network

ताक

ताक पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि भरपूर खनिजांनी भरलेले असते परंतु त्यात कॅलरी आणि फॅट्स कमी असतात. हे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही ठेवते.

Credit: Times-Network

तुळशी basil seeds

दररोज भिजवलेल्या तुळशी किंवा तुळशीच्या बियांचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते

Credit: Times-Network

दलिया

हा गव्हापासून बनलेला पदार्थ असून यात कॅलरीचे प्रमाण कमी आहे.लिया अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे, ज्यात जीवनसत्त्वे ते विविध प्रकारची उच्च फायबर असतात. ओटमीलमध्ये फायबर, प्रथिने आणि बी जीवनसत्वे असतात, हे सर्व वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रण करते.

Credit: Times-Network

मूग दाळ

मूग डाळ उच्च प्रथिनयुक्त आहे. ही दाळ चयापचय क्रिया उत्तमरित्या चालू ठेवते. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

Credit: Times-Network

ओवा

अजवाइन म्हणजेच ओवाच्या बिया उकडलेल्या पाण्यासोबत भाजून घेतल्यास पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात.

Credit: Times-Network

भोपळा bottlegourd

पोटाची चरबी कमी करण्यासाठी भोपळा हा भाजीपाल्यामधील उत्तम पर्याय आहे. यात कमी कॅलरी असते. यात फॅट्स तसेच कोलेस्ट्रॉल कमी आहेत. त्याचबरोबर भोपळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहेत.

Credit: Times-Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या आजारांमुळे वाढते पोटाची चरबी

अशा आणखी स्टोरीज पाहा