Feb 25, 2023

चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ

Rohan Juvekar

सर्व प्रकारची धान्ये

ज्या धान्यांतून शरीराला भरपूर फायबर, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतील आणि वजन नियंत्रणात राहील अशी सर्व प्रकारची धान्यं खावी

Credit: Times Network

ब्रोकोली

चाळीशीनंतर पुरुषांनी हाडे मजबूत राहावी यासाठी ब्रोकोली खावी. ब्रोकोली खाल्ल्याने शरीराला आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी मिळते तसेच कॅन्सरचे संकट टाळण्यास मदत होते.

Credit: Times Network

डार्क चॉकलेट

चाळीशीनंतर मर्यादीत प्रमाणात डार्क चॉकलेट खावे. यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते.

Credit: Times Network

ग्रीन टी

पुरुषांनी चाळीशीनंतर दिसातून किमान एकदा ग्रीन टी प्यावा. यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. तसेच शरीरातील अपायकारक घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.

Credit: Times Network

घेवडा

शरीराला आवश्यक ऊर्जा तसेच अमिनो अॅसिड मिळावे यासाठी चाळीशीनंतर अधूनमधून घेवडा ही भाजी खावी

Credit: Times Network

वांगी

चाळीशीनंतर वांगे खाल्ल्याने शरीराला फॉलिक अॅसिड मिळते तसेच कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक पोषक घटकांचा लाभ होतो

Credit: Times Network

दूध

चाळीशीनंतर प्रत्येक पुरुषाने दररोज किमान 1 ग्लास दूध प्यावे. दूध पिण्याने शरीराला कॅल्शियम आणि ऊर्जा मिळते. दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Credit: Times Network

पालक

पालक खाण्याने शरीराला आयर्न मिळते. पालक खाण्याने त्वचा, डोळे, केस यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Credit: Times Network

कलिंगड

कलिंगड खाल्ल्याने तहान आणि भूक भागते तसेच शरीराला ऊर्जा प्राप्त होते. स्टॅमिना वाढवणे, रक्त शुद्ध करणे यासाठी कलिंगड खाणे फायद्याचे ठरते. कलिंगड खाण्याने शरीराला अमिनो अॅसिड मिळते.

Credit: Times Network

दही

चाळीशीनंतर पुरुषांनी दररोज किमान 1 छोटी वाटी दही खावे. दही खाण्याने शरीराला कॅल्शियम मिळते. या कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. तसेच दही खाण्याने शरीराला ऊर्जा मिळते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. वजन कमी करण्यास मदत होते. त्वचा आणखी तजेलदार होण्यास मदत होते.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत काय खावे?

अशा आणखी स्टोरीज पाहा