Feb 27, 2023

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय

Rohan Juvekar

गोडधोड खाल्ल्यास...

सणासुदीच्या दिवसांत गोडधोड भरपूर खाल्ले जाते. या खाण्याने पोट बिघडले तरी घाबरून जाऊ नका. थोडी काळजी घेऊन तब्येत सांभाळू शकता

Credit: Times Network

चटपटीत पदार्थ

होळीच्या दिवसांत अनेक चटपटीत पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ खाल्ल्याने काही वेळा पोट बिघडण्याची शक्यता असते.

Credit: Times Network

ओवा आणि हिंग

होळीच्या दिवशी खाल्लेल्या पदार्थांमुळे पोट बिघडले तर 1 चिमूट ओवा, 1 चिमूट हिंग, 1 चिमूट काळे मीठ हे सर्व एकत्र करा. व्यवस्थित एकमेकांत मिसळा. नंतर हे मिश्रण व्यवस्थित चावून खा. नंतर 1 ग्लास गरम पाणी प्या.

Credit: Times Network

फायदा

गरम पाणी सहन होईल एवढेच घ्या. ओवा, हिंग, काळे मीठ हे मिश्रण गरम पाण्यासोबत घेतल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होईल. हलके वाटू लागेल.

Credit: Times Network

आले

होळीच्या दिवशी खालेल्या पदार्थाने पोट बिघडले तर 1 चमचा आल्याचा रस, 1 चमचा लिंबू रस आणि थोडे काळे मीठ यांचे मिश्रण करून ते घ्या. हलके वाटेल.

Credit: Times Network

फायदा

आले रस, लिंबू रस आणि काळे मीठ यांचे मिश्रण घेतल्याने पोटाशी संबंधित समस्या लवकर दूर होण्यास मदत होईल.

Credit: Times Network

पोटात इन्फेक्शन झाले तर...

पोटात इन्फेक्शन झाले तर 1 चमचा किसलेले आले 1 ग्लास दुधात मिसळा आणि ते सामान्य तापमानाचे दूध प्या. बरे वाटेल.

Credit: Times Network

इन्फेक्शनचा त्रास कमी होईल

आले आणि सामान्य तापमानाचे दूध यांचे मिश्रण घेतल्याने इन्फेक्शनचा त्रास कमी होईल आणि बरे वाटेल

Credit: Times Network

दही

पोट बिघडले तर थोडे दही खावे. दह्यातील प्रोबायोटिक घटकांमुळे पोटाशी संबंधित समस्या लवकर बरी होईल.

Credit: Times Network

केळी

पोट बिघडल्यास थोडी केळी खावी. डिसेंट्रीचा त्रास झाला तरी केळी खावी. यामुळे फायदा होईल.

Credit: Times Network

डिसेंट्री

वारंवार डिसेंट्री होत असल्यास अर्धा कप पाण्यात अर्धा कप ताजा चहा मिसळून प्या.

Credit: Times Network

बरे वाटेल

या उपायाने लवकर बरे वाटेल. डिसेंट्रीचा त्रास थांबेल.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

अशा आणखी स्टोरीज पाहा