Jan 31, 2023
BY: Sunil Desaleदात किडणे, दात किंवा हिरड्यांच्या संबंधित काही आजार असल्यास तोंडातून दुर्गंधी, तोंडाचा वास येऊ शकतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करता येऊ शकतो.
Credit: i-stock
दररोज 2 ते 3 लवंग तोंडात ठेवा. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तसेच दातदुखीपासूनही आराम मिळतो.
Credit: pexels
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करु शकता. कडुलिंबाची पाने चावून खा किंवा पाण्यात मिसळून ते पाणी प्या.
Credit: i-stock
गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. गवती चहा चघळत राहिल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
Credit: i-stock
3 ते 4 तुळशीची पाने चावून खावे. तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे तोंडाचा वास दूर होण्यास मदत होते.
Credit: i-stock
पुदिन्याची पाने पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर ते थंड झाल्यावर कुस्करुन तोंडात खा. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.
Credit: i-stock
दोन ते तीन वेलची तोंडात ठेवा यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.
Credit: i-stock
डाळिंबाची साल पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
Credit: i-stock
पेरूची पाने चघळल्याने तोंडाची दुर्गंधी लवकरच दूर होण्यास मदत होते.
Credit: i-stock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद