Sunil Desale
Dec 4, 2022
वातावरणातील बदल हा त्वचेवर दिसून येतो. अशा परिस्थितीत टाचांना भेगा पडण्याचीही समस्या उद्भवते. काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
Credit: pexels
एक कप सफरचंद व्हिनेगर कोमट पाण्यात मिक्स करा. त्यात अर्धा तास तुमचे पाय बुडवून ठेवा.
Credit: i-stock
त्यानंतर पाय स्वच्छ करा आणि त्यावर मॉईश्चरायझर लावा. सफरचंदाचे व्हिनेगर तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरेल.
Credit: i-stock
पेट्रोलियम जेली हिलिंग एजंटच्या रूपात काम करते. यामुळे जखमा भरून निघण्यास मदत होते आणि वेदनेपासून सुद्धा सुटका मिळते.
Credit: i-stock
पेट्रोलियम जेलीत थोडी हळत मिसळा आणि टाचांना भेगा पडलेल्या भागावर लावा. यानंतर मोजे घालावे.
Credit: i-stock
मध हे एक नॅचरल मॉईश्चरायझर आहे. यामध्ये जीवाणू विरोधी आणि सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म असतात.
Credit: i-stock
कोमट पाण्यात एक कप मध मिसळा. त्यात तुमचे पाय भिजवा. यामुळे पाय मऊ होण्यास मदत होते.
Credit: i-stock
बेकिंग सोडा यामध्ये अँटिबॅक्टेरिया, अँटिफंगल, अँटिसेप्टिक असे गुण असतात.
Credit: i-stock
कोमट पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि लिंबू मिक्स करा. यामध्ये 15 मिनिटे पाय भिजवा. त्यानंतर साध्या पाण्यात पाय धुवून मग मॉईश्चरायझर लावा.
Credit: i-stock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद