Mar 9, 2023

BY: Sunil Desale

गोरे होण्यासाठी खास घरगुती टिप्स​

​त्वचेचा रंग काळा किंवा गोरा का असतो?​

ज्यांच्या त्वचेत मेलेनिनचे प्रमाण अधिक असते त्यांच्या त्वचेचा रंग काळा असतो आणि ज्यांच्या त्वचेच मेलेनिनचं प्रमाण कमी असते त्यांच्या त्वचेचा रंग गोरा असतो.

Credit: istock

त्वचेची चमक वाढवेल

तुमच्या त्वचेचा रंग काळा किंवा सावळा असो... मात्र, काही उपायांनी तुम्ही त्वचेची चमक वाढवून सौंदर्यात वाढ नक्की करु शकता.

Credit: pexels

​हळद आणि दूध

हळद आणि दूध एकत्र मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे करा. हळूहळू चेहऱ्याचा रंग गोरा होण्यास मदत होईल.

Credit: istock

​बटाट्याने चेहऱ्यावर मसाज

बटाटा हा नैसर्गिकरित्या त्वचा उजळणारा मानला जातो. बटाट्याचे दोन तुकडे करा आणि त्याच्या सहाय्याने चेहऱ्यावर हळूहळू मसाज करा.

Credit: istock

​टोमॅटो आणि लिंबू

टोमॅटो आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील सौंदर्यात वाढ होईल.

Credit: istock

​आवळा

आवळा खाल्ल्याने चेहऱ्याचा रंग निखळतो. आवळा तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता.

Credit: istock

​कच्चे दूध

कच्च्या दूधात कापूस भिजवा आणि दररोज ते चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेचा रंग निखळू लागतो.

Credit: istock

​मसूर डाळ

मसूर डाळ बारीक करुन त्यात अंड्यातील पिवळे बलक, मध, दही मिसळा. ही पेस्ट फेस पॅक प्रमाणे चेहऱ्यावर लावा.

Credit: istock

​अंडी आणि मध

अंड्यात मध आणि थोडी साखर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ ते तसेच ठेवा आणि त्यानंतर हलका मसाज करुन कोमट पाण्याने धुवून काढा.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: त्वचेसाठी अक्रोडचे तेल फायद्याचे, लावा अन् चमत्कार पहा

अशा आणखी स्टोरीज पाहा