Jan 31, 2023
BY: Sunil Desaleचांगले दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. भेसळयुक्त दूध आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
Credit: pexels
सध्या विविध पावडर, यूरिया, केमिकल्स मिसळून दूध तयार केल्याच्या घटना समोर येत आहेत. दूध खरे आहे की बनावट हे तुम्ही सोप्या स्टेप्सने ओळखू शकता.
Credit: pexels
लाकूड किंवा दगडावर दुधाचे एक-दोन थेंब टाका. जर दूध खाली वाहून आले आणि त्यावर सफेद डाग पडला तर दूध पूर्ण शुद्ध आहे.
Credit: pexels
एका काचेच्या भांड्यात दूध घ्या आणि ते ढवळा. जर दुधावर फेस आला आणि तो बराच काळ तसाच राहिला तर दुधात डिटर्जंट मिसळले आहे.
Credit: pexels
जर दूध भेसळयुक्त असेल तर त्याला साबणासारखा वास येतो.
Credit: istock
सिंथेटिक दुधात यूरिया मिसळल्यास ते घट्ट पिवळे होते.
Credit: pexels
चवीला दूध गोडसर असते मात्र, बनावट दूध हे कडवट असते.
Credit: pexels
अर्धा चमचा दूध आणि सोयाबीन पावडर मिक्स करा. त्यामध्ये लिटमस पेपर तीस सेकंदांपर्यंत बुडवून ठेवा. कागदाचा रंग जर निळा झाला तर दुधात यूरिया मिसळले आहे असे समजा.
Credit: pexels
5 मिली दुधामध्ये दोन मोठे चमचे मीठ मिसळा. दूध भेसळयुक्त असल्यास हे मिश्रण निळसर होईल.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद