Jan 12, 2023

BY: Sunil Desale

जेवणात चुकून पडले जास्त मीठ तर असे करा झटक्यात कमी

​मीठ

कोणत्याही पदार्थाला चविष्ट बनवण्यात मीठ महत्त्वाची भूमिका बजावते. जेवणात कधी-कधी चुकून जास्त मीठ पडते. जास्त मीठ पडल्याने चव खराब होते.

Credit: pexels

​अन्नात जास्त मीठ

जेवणात मीठ कमी असल्यास ते पुन्हा टाकता येते. मात्र, जास्त मीठ पडल्यास थोडे अवघड होऊन जाते.

Credit: pexels

​मीठ कमी करण्याच्या टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही जेवणातील अतिरिक्त मीठ कमी करु शकता.

Credit: pexels

​बटाटा

भाजी किंवा सूपमध्ये जास्त मीठ झाल्यास त्यामध्ये कच्चा बटाटा सोलून टाका. त्यानंतर ते सर्व्ह करण्यापूर्वी त्यातील बटाट्याचे पीस काढून टाका. बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेतो.

Credit: pexels

​डाळीचे पीठ / बेसन

कोरड्या भाजीत अतिरिक्त मीठ झाल्यास ते कमी करण्यासाठी बेसन हलक्या प्रमाणात भाजा आणि त्यावर टाका. असे केल्याने मीठाचे प्रमाण संतुलित होते.

Credit: pexels

​लिंबू

भाजीत मिठाचे प्रमाण जास्त असल्यास तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करु शकता. लिंबाचा रस मिठासोबतच चव सुद्धा संतुलित करू सकतो.

Credit: pexels

​दही

जर तुमच्या भाजीत मीठ जास्त झाले तर तुम्ही दह्याच्या मदतीने ते कमी करु शकता. त्यासाठी तुम्ही भाजीत अर्धी वाटी दही टाकू शकता.

Credit: BCCL

​दह्याचा वापर कसा करावा

दह्याचा वापर करुन तुम्ही भाजीत फक्त मीठाचे प्रमाण संतुलित करु शकत नाही तर इतर खाद्यपदार्थांची चवही वाढवू शकता.

Credit: BCCL

​देशी तूप

देशी तूप अन्नाची चव आणि सुगंध वाढवण्यास मदत करते. यासोबतच जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करु शकता.

Credit: BCCL

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हिवाळ्यात हळदीचे गरम दूध पिण्याचे फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा