By: Archana Patkar

पायाचे टॅनिंग कसे दूर कराल?

Nov 24, 2022

​काय आहे कारण?

पायात सतत चप्पल, शूज घातल्याने, अथवा रिकाम्या पायाने चालल्याने तसेच सतत उन्हात असल्यास पाय काळे पडतात.

Credit: instagram

​अशी मिळवा सुटका

पायांचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही एखादी ब्युटी ट्रीटमेंट घेण्याऐवजी हे सोपे उपाय वापरून यापासून सुटका मिळवू शकता.

Credit: instagram

​कच्चे दूध आणि क्रीम

तीन ते चार चमचे कच्चे दूध आणि एक मोठा चमचा फ्रेश क्रीम मिसळा. ही पेस्ट दोन ते तीन तास लावून ठेवा. नंतर धुवा.

Credit: instagram

लिंबू आणि साखर

एका लिंबूच्या रसामध्ये एक चमचा साखर मिसळा. हे मिश्रण पायावर लावा. 15 मिनिटे हे मिश्रण असेच राहू द्या.

Credit: instagram

​पपई आणि मध

पपईमध्ये मध मिक्स करून त्याची पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावा. अर्धा तास हे मिश्रण असेच राहू द्या. यामुळे पायाचा कलर उजळेल.

Credit: instagram

​बेसन आणि हळद स्क्रब

बेसन आणि हळदीचे मिश्रण हे पायांसाठी चांगला स्क्रब आहे. दह्यात बेसन आणि थोडीशी हळद मिसळा. ही पेस्ट स्क्रबप्रमाणे वापरा.

Credit: instagram

​दही आणि ओट्स

ओट्सची पावडर बनवा. त्यात दही मिक्स करा. ही पेस्ट पायांना लावा. 20 मिनिटांनी धुवा.

Credit: instagram

You may also like

थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाच...
तुम्हाला अंडीची ऍलर्जी आहे, काय आहे कारण...

​टॅनिंगपासून कसा बचाव कराल?

पायाच्या टॅनिंगपासून बचावासाठी तुम्ही मोकळ्या पायाने जमिनीवर चाला. याशिवाय मोज्यांचा वापर करा.

Credit: instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा

अशा आणखी स्टोरीज पाहा