Dec 3, 2022

BY: Sunil Desale

हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स

​व्यायाम

दररोज व्यायाम केल्याने आपले शरीर निरोगी राहते. यासोबतच मसल्स निर्माण करण्यासाठीही मदत होते. जाणून घेऊयात हिप्सला शेप देण्यासाठी नेमके कोणते व्यायाम करावेत.

Credit: pexels

स्कॉट्स

सरळ उभे रहा. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा. मग आपल्या समोर हात धरा. मग हिप्स बाहेर काढून खाली बसा. तुमची पोझिशन ही खुर्चीसारखी होईल. असे सातत्याने करत रहा.

Credit: pexels

​साईड लेग

सर्वप्रथम डाव्या बाजूला सरळ झोपा. मग उजवा पाय वर करा. थोडा वेळ त्याच पोझिशनमध्ये रहा. मग तसेच दुसऱ्या पायासोबत करा.

Credit: pexels

​हिप रेज

सर्वातआधी सरळ झोपा. आपले हात शरीराच्या बाजूला सरळ जमिनीवर ठेवा. मग हिप्सवर भार देऊन बॉडी वर उचला. आपल्या बॉडीचा भार खांद्यावर थोडावेळ ठेवा.

Credit: pexels

​हिप अपडक्शन

प्लँक पोझिशनमध्ये या. आता हिप्स उजव्या बाजूला वाकवा. मग डाव्याबाजूला... असेच 15 ते 20 वेळा करा.

Credit: pexels

​सिजर किक

पाठीवर झोपा. उजवा पाय 45 अंश आणि डावा पाय जमिनीपासून थोडा वर घ्या. त्यानंतर एक पाय खाली घ्या आणि मग दुसरा पाय वर घ्या. हा व्यायाम करताना तुमच्या पायाची स्थिती कात्रीसारखी असेल.

Credit: pexels

​पायऱ्या चढणे

ऑफिसमध्ये किंवा रेल्वे स्टेशन, मेट्रो स्थानकात जाताना लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्या चढा. दररोज 20 मिनिटे पायऱ्या चढा. हा एक खूप चांगला व्यायाम आहे ज्यामुळे हिप्सला चांगला शेप मिळतो.

Credit: pexels

​हिप्सला आकार देण्यासाठी

हिप्सला चांगला शेप देण्यासाठी तुम्ही दररोज अशा प्रकारे व्यायाम केला पाहिजे.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मानेवरचे काळे डाग घालविण्याचे सोपे घरगुती उपाय

अशा आणखी स्टोरीज पाहा