Dec 11, 2022
BY: Sunil Desaleथंडीत आळस आणि सुस्ती अधिक असते. यामुळे अंधरुणातून उठण्याची इच्छा होत नाही. मात्र, काही टिप्सचा वापर केल्यास तुम्ही सकाळी लवकर उठू शकता.
Credit: pexels
अलार्म हा नेहमी बेडपासून काही अंतरावर दूर ठेवा. जेणेकरुन अलार्म बंद करण्यासाठी तुम्ही बेडवरुन उठाल.
Credit: i-stock
आळस आणि सुस्ती दूर ठेवायचा असल्यास झोपण्यापूर्वी थोडेसेच अन्न खा. खासकरुन हिरव्या भाज्या खा.
Credit: i-stock
रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्या, यामुळे सकाळी लघवीसाठी तुम्हाला उठावे लागेल.
Credit: i-stock
झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा. असे केल्यास तुम्हाला अलार्मची आवश्यकता भासणार नाही.
Credit: i-stock
दिवसा किंवा संध्याकाळी एखादी डुलकी काढत असाल तर ते टाळा. असे केल्यास रात्री लवकर झोप लागणार नाही.
Credit: i-stock
सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही निरोगी आणि अॅक्टिव्ह राहाल. तसेच तुम्हाला चांगली झोप सुद्धा लागेल.
Credit: i-stock
सकाळी अंथरुणातून उठल्यावर काही वेळातच अंघोळ करा. असे केल्यास पाणी शरीराचे तापमान बदलण्यास मदत करेल आणि तुम्हाला अॅक्टिव्ह वाटू लागेल.
Credit: i-stock
तुम्हाला दिवसभरात नेमकं काय करायचं आहे हे ठरवा. यामुळे दिवसाची सुरुवात करताना तुम्ही अॅक्टिव्ह असाल.
Credit: i-stock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद