पावसाळ्यात हे आजार होतात, राहा सतर्क

Prashant Jadhav

Jun 20, 2022

माहीत असणे आवश्यक

पावसाळा आपल्यासोबत अनेक धोकादायक आजार घेऊन येतो, जे घाण, कीटक किंवा डासांमुळे होऊ शकतात. त्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी त्यांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Credit: pexels

​डेंग्यू

एडिस इजिप्ती डासांच्या चाव्याव्दारे पसरणारा हा रोग जीवघेणा ठरू शकतो. डेंग्यूमध्ये डोकेदुखी, थकवा आणि प्लेटलेट्स कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

Credit: istock

​मलेरिया

हा रोग संक्रमित मादी अॅनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. यामध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात.

Credit: istock

​विषमज्वर (टाइफॉइड)

टायफॉइड ताप हा साल्मोनेला टायफी बॅक्टेरियामुळे होतो. या आजारामुळे अंगदुखी, ताप, भूक न लागणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात.

Credit: istock

​अ प्रकारची काविळ (हेपेटाइटिस ए)

हा रोग संक्रमित अन्न, पाणी किंवा त्याचा त्रास असलेल्या रुग्णाच्या संपर्कातून पसरतो. सामान्य लक्षणे म्हणजे कावीळ, थकवा, भूक न लागणे.

Credit: istock

​इन्फ्लूएंझा (सर्दी पडसं)

सर्दी आणि फ्लू हे सर्वात सामान्य आजार आहेत जे पावसाळ्यात होतात. हे टाळण्यासाठी, व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या आणि फळे खा.

Credit: istock

​अन्न विषबाधा (फूड पॉइझनिंग)

पावसाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. या आजारात पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी असू शकतात.

Credit: istock

​सल्ला

खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाका. असे केल्याने तुमच्या आजूबाजूला बसलेले लोक संसर्ग होण्यापासून वाचतील.

Credit: istock

​स्वच्छता

घरातील प्रत्येकाने वेगळा हँड टॉवेल वापरावा. असे केल्याने रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया तुमचे नुकसान करू शकणार नाहीत.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वयाच्या ४५ व्या वर्षीही पॉप गायिका शकीरा इतकी फिट कशी?