Apr 4, 2023

BY: Sunil Desale

​या भाज्या खरेदी करायला जाल तर खिसा रिकामा कराल​

खरेदी करण्यापूर्वी बजेट पाहा

भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे अनेकदा नागरिक नाराज होतात. 100 रुपयांहून अधिक किमतीची भाजी खरेदी करणं सर्वांनाच परवडत नाही. मात्र, अशा काही भाज्या आहेत ज्यांच्या किमती तुम्ही ऐकल्या तर हैराण व्हाल.

Credit: pexels

​शतावरी

शतावरी ही भारतातील सर्वात महाग भाज्यांपैकी एक आहे. याची किंमत सुमारे 1200 ते 1500 रुपये प्रति किलो आहे. याची शेती भारतात होते पण व्यावसायिक पातळीवर फार होत नाही.

Credit: pexels

हॉप शूट्स​

हॉप यूट्स युरोपियन देशांत प्रसिद्ध आहे. याची गणना जगातील सर्वात महाग भाज्यांमध्ये होते. याची किंमत 85,000 रुपये प्रति किलो इतकी आहे. भारतात याची लागवड केली जात नाही.

Credit: pexels

​बोक चोए (Bok Choy)

बोक चोए हा चायनीज कोबीचा प्रकार आहे. ही भाजी मुख्यत: थाई पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. बोक चॉयची एक देठ खरेदी करण्यासाठी 115 रुपये मोजावे लागतात.

Credit: pexels

चेरी टोमॅटो

चेरी टोमॅटो नेहमीच्या टोमॅटोपेक्षा खूपच लहान असतात. हे विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जातात. एक किलो चेरी टोमॅटोची किंमत सुमारे 250 ते 300 रुपयांपर्यंत आहे.

Credit: pexels

​वसाबी रूट

वसाबी रूट ही भाजी बहुतेक उच्च श्रेणीतील निवासी करतात. यामागचं कारण म्हणजे, ही भाजी उगवणं सर्वात कठीण आहे. एक किलो वसाबी मुळाची किंमत 18,500 रुपये इतकी आहे.

Credit: pexels

जुकिनी

जुकिनी ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि कार्ब-साखर खूप कमी असते. यामध्ये असलेले पेक्टिन फायबर हृदयाला निरोगी ठेवते. कारण, एक किलो जुकिनीची किंमत 150 ते 200 रुपयांच्या घरात आहे.

Credit: pexels

You may also like

ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण...
भुवयांचे केस का गळतात?

यामाशिता पालक​

ही भाजी केवळ फ्रान्समध्ये उगवली जाते. या भाजीची साधारणत: किंमत 3000 रुपये प्रति किलो इतकी आहे.

Credit: pexels

​मत्सुटेक मशरूम

मत्सुटेक मशरूम एक जापानी मशरूम आहे. याची चव दालचिनीसारखी असते. याची किंमत साधारणत: 73,750 रुपये किलो इतकी आहे.

Credit: pexels

​सेलेरी

सेलेरी किंवा अजवाइनचे पान हे कोथिंबीर प्रमाणे असते. सेलरी बहुतेक इटालियन पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. कडू आणि गोड अशी चव असलेली ही भाजी 200 ते 300 रुपये किलो दराने विक्री केली जाते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय

अशा आणखी स्टोरीज पाहा