Apr 1, 2023
BY: Sunil Desaleज्येष्ठमध हे असे हर्बल उत्पादन आहे जे आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकते. जाणून घ्या घशाच्या संबंधित समस्यांवर ज्येष्ठमधाचा कसा वापर केला जाऊ शकतो.
Credit: istock
सोडियम, कॅलरीज, कॅल्शियम, अमिनो अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स यासारखे घटक ज्येष्ठमधामध्ये असतात.
Credit: istock
अँटी-व्हायरल आणि अँटी- मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध ज्येष्ठमध हे घशाच्या संसर्गापासून तुम्हाला आराम देते.
Credit: pexels
घशात होणारी खवखव पासून सुटका मिळवण्यासाठी ज्येष्ठमधाचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे घशात एक प्रकारे ओलावा निर्माण होतो.
Credit: istock
ज्येष्ठमधाचे पाणी प्यायल्याने किंवा ते चोखल्याने कफची समस्या दूर होऊ शकते. ज्येष्ठमधामध्ये ब्रोनकोडिलेट तत्त्व असते ज्यामुळे सर्दीपासून आराम मिळतो.
Credit: istock
श्वसनाच्या संबंधित समस्यांवर ज्येष्ठमध हे गुणकारी आहे.
Credit: istock
ज्येष्ठमध हे तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकण्याचे काम करते यामुळे ओरल हेल्थमध्ये सुधारणा होते. तसेच तोंड येण्याच्या समस्येपासूनही दिलासा मिळतो.
Credit: istock
ज्येष्ठमधाची पावडर तुळशीच्या पानांच्या रसात उकळवा. त्यामध्ये मध मिसळा आणि मग ते प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळू शकतो.
Credit: istock
इन्फेक्शनमुळे घसा दुखत असेल तर ज्येष्ठमध तोंडात ठेवू ते चोखू शकता. यामुळे काहीवेळातच तुम्हाला आराम मिळेल.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद