नखं खाणं तुम्हाला पडू शकतं भारी!

Rohit Gole

Sep 22, 2022

आरोग्यावर परिणाम

नखे चावण्याची सवय लोकांमध्ये सामान्य आहे. लोक अनेकदा घाबरून किंवा तणावात असे करतात. पण, याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

Credit: pexels

​संसर्गाचा धोका

नख चावल्याने त्याभोवतीची त्वचा वेदनादायक, लाल, सुजलेली होते, जे पॅरोनिचियाचे लक्षण आहे.

Credit: istock

​दातांना नुकसान

नियमितपणे नखे चावल्याने दात निखळू शकतात, ज्यासाठी 'करेक्शनल ब्रेसिज' करण्याची गरज पडू शकते.

Credit: istock

​हिरड्यांवर परिणाम

वारंवार नखे चावल्यामुळे हिरड्या कमकुवत होऊन संसर्ग होऊ शकतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Credit: istock

​पोटाच्या समस्या

हात अनेक प्रकारच्या घाण आणि जीवाणूंच्या संपर्कात येतात. नखे चघळल्याने ही घाण थेट तोंडातून पोटात जाते, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो.

Credit: istock

​सवय कशी मोडायची?

नखे चावण्याची ही सवय दूर करण्यासाठी एखाद्याने तणाव आणि चिंता मॅनेज करणं शिकलं पाहिजे.

Credit: istock

​नखाला कडू पदार्थ लावा

नखावर काही कडू पदार्थ लावा म्हणजे सुरुवातीला नखे चावण्याची सवय कमी होऊ शकते.

Credit: istock

​तोंड व्यस्त ठेवा

तुमचे तोंड व्यस्त ठेवण्यासाठी दुसरे काहीतरी निवडा, जसे की एखादे वाद्य वाजवणे किंवा पुदिन्याच्या गोळ्या खाणे.

Credit: istock

​डॉक्टरांचा सल्ला

प्रत्येक पद्धतीचा अवलंब करूनही सवय सुटत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लिंबू आणि जायफळमुळे दूर होईल पोटदुखी