Mar 13, 2023
केसांमधील कोंड्याची समस्या खूप त्रासदायक ठरू शकते. कोंड्याच्या समस्येमुळे टाळू कोरडे होत असते. टाळूवर घाण आणि खाज सुटते.
Istock
डोक्यात कोंडा झाला असेल तर ती समस्या वाढत जात असते. यामुळे केस गळणं, केस बारीक होणं, तुटून जाणं, टकल पडणं आदी समस्या वाढत असतात.
Istock
डोक्यातील कोंडापासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाच्या तेलासह दररोज सौम्य शॅम्पूने केस धुणे चांगले फायदेशीर ठरू शकते.
Istock
कडुलिंबाची पाने ही केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोंड्याच्या समस्येसाठी कडुनलिंबाची पाने खाणे आणि त्याचे तेल देखील गुणकारी आहे.
Istock
टाळूवर बुरशी लागत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने खावीत. जर कडुलिंबाची पाने जास्त कडू असतील तर त्यात साखर किंवा मध टाकून खाऊ शकतात.
Istock
कोंड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने उकाळून त्याचा काढा बनवा आणि ते प्या.
Istock
कोंड्याची समस्या असेल तर केसांना रात्रभर कडुलिंबाचे तेल लावून ठेवा. कडुलिंबाचे तेलाने केंसांची मालीश करा, जेणेकरून तेल केसांच्या मुळापर्यंत पोहचेल.
Istock
कडुलिंबाचे तेल लावल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात जाऊन नका. कारण लिंबू तेल मिसळून सूर्यप्रकाशात गेल्याने वाईट परिणाम होईल.
Istock
खोबरेल तेलात कडुलिंबाचे पाने उकाळून घ्या. त्यात लिंबूचा रस टाका याच्या मिश्रणाने कडुलिंबाचे तेल बनवू घ्या.
Istock
कोंड्याची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी कडुलिंबाचे पाने, मध आणि दही मिसळून त्याचे हेअर मास्क लावू शकता.
Istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद