Sunil Desale
Mar 15, 2023
ढेकर येण्याची अनेक कारणे आहेत. जेवत असताना किंवा जेवल्यावर आपले पोट पूर्ण भरते तेव्हा सामान्यत: ढेकर येते. मात्र, जेव्हा आपल्याला जास्त भूक लागते तेव्हाही ढेकर येते.
Credit: pexels
ढेकर ही सामान्य गोष्ट असली तरी प्रत्येक वेळी ते सामान्य असेलच असे नाही. कधी-कधी पोटात जखम किंवा पेप्टिक अल्सर असल्यासही ढेकर येते.
Credit: istock
जेव्हा लहान आतडीच्या सुरुवातीला जखम होते. अशा प्रकारच्या अल्सरला पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक अल्सर म्हणतात.
Credit: istock
पेप्टिक अल्सरचे लक्षण केवळ जास्त ढेकर येणे असे नाही तर याचे इतरही काही लक्षणे आहेत.
Credit: istock
अशा प्रकारच्या अल्सरमध्ये पोटात सूज, छातीत जळजळ, गॅसची समस्या उद्भवते.
Credit: istock
शौचाला गेल्यावर रक्त येणे किंवा शौचाचा रंग गडद होणे हे सुद्धा पेप्टिक अल्सरचे लक्षण असू शकते.
Credit: istock
खोकला आल्यावर तोंडातून रक्त येणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे हे सुद्धा पेप्टिक अल्सरचे लक्षण असू शकते.
Credit: istock
पेप्टिक अल्सरचे आणखी एक लक्षण म्हणजे वजन कमी होणे आणि भूक न लागणे आहे.
Credit: pexels
जेव्हा आतड्यांमध्ये जळजळ होते आणि पोटात जखम झाल्यासारखे वाटते तर हे सुद्धा पोटात अल्सर झाल्याचे लक्षण आहे.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद