Dec 8, 2022
BY: Sunil Desaleडॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, वयाच्या तिशीनंतर सुद्धा महिला गरोदर होऊ शकतात. मात्र, काही महिलांना याबाबत समस्या भेडसावतात.
Credit: pexels
24 ते 30 वय हे आई होण्यासाठी योग्य वय आहे. मात्र, 32 व्या वर्षी सुद्धा गरोदर होणे योग्य मानले जाते. पण त्यानंतर अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो.
Credit: pexels
गर्भधारणेसाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे संतुलित वजन, जीवनशैली, योग्य अन्नपदार्थ खाणे गरजेचे आहे. मात्र, जंक फूडपासून दूर रहा.
Credit: pexels
गर्भधारणेच्या संबंधित अडचणी या वयाच्या तिशीनंतर वाढू शकतात. या वयात गर्भपात, बाळात जन्मदोष, मुदतपूर्व जन्म, बाळाचे वजन कमी असणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात.
Credit: pexels
वयाच्या 30 वर्षांनंतर तुम्ही आई होण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
Credit: pexels
वजन जास्त असणे किंवा कमी असणे यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
Credit: pexels
गर्भधारणेसाठी आपल्या पुरुष जोडीदाराचे आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे. पुरुषांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 19 हून कमी आणि 30 पेक्षा जास्त असणे म्हणजे कमी प्रजनन दराचे लक्षण आहे.
Credit: pexels
स्त्री आणि पुरुष दोघांनीही दारू आणि सिगारेट याच्यापासून दूर रहायला हवे. कारण, या गोष्टी लैंगिक क्षमतेवर परिणाम करु शकतात.
Credit: pexels
स्ट्रेस हार्मोन्समध्ये वाढ झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद