Nov 22, 2022

BY: Sunil Desale

लाल रंगाची ही फळे-भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर, मिळतात असंख्य फायदे

​लाल रंगाची फळे आणि भाज्या

लाल रंगाच्या भाज्या आणि फळे यामध्ये खूप पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूपच चांगले असतात. जाणून घेऊयात त्याच्या संदर्भात....

Credit: Pexels

​बीटरूट

बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर याचे प्रमाण जास्त असते. हे शरीरातील लोहाची कमतरता दूर करतं. बीटरूटचा ज्यूस आणि सलाडमध्ये तुम्ही वापर करु शकता.

Credit: Pexels

​कलिंगड

कलिंगडमध्ये लाइकोपिन नावाचे तत्व आढळून येते. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते आणि हे दररोज खाल्ल्याने स्ट्रोक सारखे आजार दूर होण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होते.

Credit: Pexels

​सफरचंद

सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर सारखी पोषक तत्त्वे आढळून येतात. जे आरोग्यासाठी एक वरदान ठरतात. याच्या दररोजच्या सेवनाने ह्रदयविकार, उच्च रक्तदाब या सारख्या समस्यांपासून दूर राहतात.

Credit: Pexels

​टोमॅटो

विटॅमिन सी, लायकोपीन आणि पोटॅशियमयुक्त असलेले लाल टोमॅटो हे कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे दररोज खाल्ल्याने त्वचेच्या संबंधित समस्या दूर होतात.

Credit: Pexels

​डाळिंब

डाळिंबात असलेले अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेट्री आणि इतर गुणधर्म यामुळे आरोग्याला भरपूर फायदे होतात. याच्या सेवनाने रक्ताची कमतरता जाणवत नाही. प्रत्येक महिलेने दररोज डाळिंब खायला हवे.

Credit: Pexels

​स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीत पोटॅशियम, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स सारखी तत्त्वे असतात. जे ह्रदयासाठी खूपच फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

Credit: Pexels

​चेरी

चेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चेरी खाल्ल्याने झोप न येण्याची समस्या तसेच ह्रदयविकाराच्या संबंधित समस्या दूर होतात.

Credit: Pexels

​इतरही पदार्थ

यासोबतच लाल कोबी, मनुके, लाल कांदा, लाल मसाला, लाला बीन्स यांचाही आहारात समावेश करावा. यामुळे तुम्ही निरोगी राहाल.

Credit: Pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: डिटॉक्स ड्रिंक्स

अशा आणखी स्टोरीज पाहा