Feb 5, 2023

BY: Sunil Desale

मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होते?

शरीरासाठी मीठ आवश्यक

मीठ हे केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर यामध्ये असलेले मॅग्नेशियम, कॅल्शेयिम, सोडियम आणि ब्रोमाइड शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Credit: pexels

जास्त मीठ आरोग्यासाठी नुकसानदायक

मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला नुकसानदायक ठरू शकते.

Credit: pexels

मीठ खाल्ल्याने समस्या

जाणून घेऊयात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

Credit: pexels

ह्रदयासाठी धोकादायक

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने केवळ ह्रदय कमकुवत होत नाही तर ह्रदयविकाराचा धोकाही वाढतो.

Credit: pexels

ब्लड प्रेशर

जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका उद्भवू शकतो.

Credit: pexels

स्किन इन्फेक्शन

जास्त मीठ खाल्ल्याने त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यामध्ये त्वचेवर जळजळ, पिंपल्स याचाही समावेश आहे.

Credit: pexels

पोटफुगी

जास्त मीठ खाण्याच्या सवयीमुळे तुम्हाला पोटफुगीची समस्या होऊ शकते.

Credit: pexels

हाडे कमकुवत

मीठात सोडियम जास्त प्रमाणात असते जे कॅल्शियम लघवीतून काढते. यामुळे मीठाचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.

Credit: pexels

दिवसभरात किती खावे

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आपल्या दैनंदिन आहारात केवळ 5 ग्रॅम मीठ पुरेसे आहे. यामुळे गंभीर आजारांपासून तुम्ही दूर रहाल.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चेहऱ्यावर दिसतायत सुरकुत्या, तर या सवयी बदला दिसाल तरुण

अशा आणखी स्टोरीज पाहा