Feb 11, 2023

BY: Sunil Desale

तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान

पोटावर का झोपू नये?

अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते तर काहींना पाठीवर झोपण्याची. पोटावर झोपल्यास काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या....

Credit: i-stock

काय होऊ शकते?

जे व्यक्ती पोटावर झोपतात त्यांना आतड्यांच्या संबंधित आजार, शरीराच्या काही अवयवांना मुंग्या येणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

Credit: pexels

पोटाच्या संबंधित समस्या

अशा स्थितीत झोपल्यास पोटावर दाब येतो. परिणामी अन्न पचनास त्रास होतो आणि जुलाब, गॅस यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Credit: i-stock

मुंग्या येणे

सातत्याने अशा स्थितीत झोपणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील काही अवयवांना मुंग्या येण्याची शक्यता असते.

Credit: i-stock

गरोदरपणात

जर तुम्ही गरोदर आङात तर पोटावर झोपणे टाळा. कारण, याचा परिणाम गर्भातील बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

Credit: i-stock

मणक्यावर वाईट परिणाम

चुकीच्या पद्धतीने झोपल्यास मणक्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि पाठदुखीची समस्या जाणवू शकते.

Credit: i-stock

घसा आणि डोकेदुखी

पोटावर झोपल्यास डोकेदुखीचा त्रास होतो तसेच रक्त पुरवठा योग्य होत नाही. यामुळे वेदनांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

Credit: i-stock

स्तन दुखण्याची समस्या

जर तुम्हाला ब्रेस्ट दुखी (स्तन दुखण्याची) समस्या जाणवत असेल तर पोटावर झोपणे हे त्यामागचं एक कारण असू शकते.

Credit: i-stock

त्वचेवर परिणाम

तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत झोपल्याने चेहऱ्याच्या त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे त्वचा आकुंचन पावण्यास सुरुवात होते.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे 7 पेय वाढवतील हिमोग्लोबिन

अशा आणखी स्टोरीज पाहा