Feb 5, 2023
BY: Sunil Desaleघशाची खवखव सुरू झाल्यानंतर खोकला सुरू होतो. या समस्येत घसा दुखणे तसेच काही खाद्य-पदार्थ खाताना त्रास होतो.
Credit: pexels
काही घरगुती उपायांनी तुम्ही घशाची खवखव, घसादुखीपासून मुक्ती मिळवू शकता.
Credit: pexels
मधामध्ये अँटीफंगल गुण असतात. तर तुळस ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे दोन्हीही घसादुखीपासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात.
Credit: pexels
अशा स्थितीत तुम्ही तुळस आणि मधाचा चहा बनवून पिऊ शकतात. तुळस आणि मधाचा चहा हा घसादुखीवर फायदेशीर मानला जातो.
Credit: pexels
एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि थोडेसे मीठ पाण्यात मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.
Credit: pexels
घसादुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळस, लवंग, काळी मिरी आणि अद्रकचा चहा यांचं सेवन करु शकता.
Credit: pexels
हळदीमध्ये नॅचरल अँटीबायोटिक गुण असतात. याच्या सेवनाने घशाची खवखव आणि घसादुखी कमी होण्यास मदत होते.
Credit: pexels
लसणात एलिसिन नावाचे घटक असते, याच्या सेवनाने घशातील संसर्ग दूर होण्यास मदत होते.
Credit: pexels
घशाची खवखव आणि घसा दुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी मिठ-पाण्याच्या गुळण्या हा सुद्धा एक चांगला उपाय आहे.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद