Mar 23, 2023

Summer Drinks For Weightloss

Rohan Juvekar

समर ड्रिंक्स पिण्याचे फायदे

​समर ड्रिंक्स प्यायल्याने शरीरातील पाण्याच्या पातळीचे संतुलन राहते तसेच वजन कमी करण्यास मदत होते. ज्यांचे वजन आधीपासून व्यवस्थित आहे त्यांना समर ड्रिंक्स वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

Credit: Times Network

लिंबू सरबत

उन्हाळ्यात लिंबू, साखर, पाणी यांच्यापासून लिंबू सरबत करून ते प्यायल्याने शरीराला कामासाठी ऊर्जा मिळते. वजन कमी करायचे असेल तर साखरेऐवजी मर्यादीत प्रमाणात मीठ वापरून सरबत तयार करू शकता. हे सरबत शरीरातील पाण्याची पातळी जपण्यासाठी मदत करते.

Credit: Times Network

मेथीचे पाणी

थोडे मेथीचे पाण्यात किमान 4 ते 6 तास भिजवून नंतर ते पाणी प्यावे आणि पाण्यातील मेथीचे दाणे चावून खावे. यामुळे चवीसाठी या पाण्यात थोडा लिंबूरस मिसळू शकता. हे पाणी वजन कमी करण्यास आणि पचनक्षमता सुधारण्यास मदत करते.

Credit: Times Network

काकडीचे पाणी

पाण्यात काकडीच्या बारीक फोडी किमान तासभर भिजवून ठेवा नंतर ते पाणी प्या. काकडी चिरताना काकडीतून निघणारे पाणी या पाण्यात मिसळू शकता. काकडीचे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी जपली जाते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Credit: Times Network

ताक

दही घुसळून त्याचे ताक तयार करा. हे ताक पिण्याने वजन कमी होण्यास मदत होईल तसेच शरीरातील पाण्याची पातळी जपली जाईल.

Credit: Times Network

लिंबू पाणी

पाण्यात लिंबाच्या एक किंवा दोन फोडी तासभर भिजवून ठेवा नंतर ते पाणी प्या. पाण्यातील लिंबाच्या फोडी चावून खा अथवा काढून टाका. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी जपली जाईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

Credit: Times Network

नारळपाणी

नारळपाणी प्यायल्याने ऊर्जा मिळेल तसेच शरीराची पाण्याची पातळी जपली जाते

Credit: Times Network

You may also like

लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे ...
गरोदरपणात कारले खावे की नाही?

कलिंगड ज्युस

कलिंगडाचा ज्युस करून तो प्यायल्याने शरीराची पाण्याची पातळी जपली जाते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. वजन कमी करायचे असेल तर ज्युसमध्ये साखर मिसळणे टाळा.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे आणि उपाय

अशा आणखी स्टोरीज पाहा