Sunil Desale
Feb 7, 2023
किडनीचे काम रक्त स्वच्छ करण्यासोबतच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे आहे. कधी-कधी वाईट जीवनशैलीमुळे किंवा आजारपणामुळे ते नीट काम करत नाही. या परिस्थितीत शरीरातून अनेक प्रकारची संकेत मिळतात.
Credit: istock
किडनी व्यवस्थित काम करत नसल्यास रक्तात टॉक्सिन आणि घाण जमा होऊ लागते. यामुळे जास्त प्रमाणात थकवा आणि अशक्तपणा जावणतो.
Credit: pexels
जेव्हा किडनीचे फिल्टर खराब होतात तेव्हा रक्त पेशी यूरिनमध्ये लीक होण्यास सुरुवात होते.
Credit: istock
सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा इलेक्ट्रोलाइट्स पातळीत असंतुलन झाल्यास स्नायू निकामी होऊ शकतात. अशा परिस्थितीत हात-पायांना सूज येऊ लागते.
Credit: istock
त्वचा कोरडी होणे आणि खाज येणे ही किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
Credit: istock
जर तुम्हाला व्यवस्थित भूक लागत नाही तर हे किडनीच्या संबंधित आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
Credit: istock
किडनीची समस्या असल्यास झोप व्यवस्थित येत नाही. तसेच लठ्ठपणा आणि दीर्घकालीन किडनीचा आजार यामध्ये एक कनेक्शन असू शकते.
Credit: istock
जेव्हा लघवीत प्रोटीन लीक होऊ लागतात आणि डोळ्याभोवती हलकी सूज येऊ लागते तेव्हा किडनी व्यवस्थित फिल्टर करत नाहीये असे समजा.
Credit: istock
वारंवार लघवीला येणे हे किडनीच्या संबंधित आजाराचे लक्षण असलण्याची शक्यता आहे.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद