May 31, 2023
BY: Pallavi ShivleCredit: Times Network
Credit: Times Network
शाकाहारी लोकांनी सोयाबीनचे सेवन केलेच पाहिजे. हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे आणि त्यात इतर पोषक तत्वांचा खजिना आहे. सोयाबीन खाल्ल्याने शरीराला प्रोटीनसोबत आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात.
Credit: Times Network
मसूर हे प्रोटीनयुक्त अन्न मानले जाते. केवल मसूर डाळच नव्हे तर सर्व डाळींमध्ये पोषक तत्वांचा खजिना दडलेला आहे. सुमारे 200 ग्रॅम मसूरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रथिने असतात. डाळींमध्ये फायबर, फोलेट, मॅंगनीज आणि आयर्नचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीर मजबूत होते.
Credit: Times Network
बीन्स हे प्रथिनयुक्त अन्न मानले जाते. सर्व प्रकारच्या बीन्समध्ये पोषक तत्व असतात, जे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
Credit: Times Network
सब्जाच्या बिया प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. सुमारे 100 ग्रॅम चिया बियांमध्ये 17 ग्रॅम प्रथिने असतात. जर तुम्ही रोज एक चमचा सब्जाच्या बियांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता कधीच भासणार नाही.
Credit: Times Network
याच्या सेवनाने लोकांना भरपूर प्रथिने आणि फायबर मिळू शकतात. सुमारे 40 ग्रॅम ओट्समध्ये 5 ग्रॅम प्रथिने आणि 4 ग्रॅम फायबर असते. क्विनोआ हा प्रथिनांचा एक चांगला स्रोत देखील मानला जातो आणि त्यात अनेक पोषक घटक देखील असतात.
Credit: Times Network
हिरवे वाटाणे, गहू आणि बाजरीपासून बनवलेली भाकरी, गावठी तांदूळ, अक्रोड, फळे आणि भाज्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात फायबर देखील मिळेल आणि तुमची पचनक्रिया सुधारेल.
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद