Jan 24, 2023

BY: Sunil Desale

या सवयींमुळे खराब होतात दात

नखे चावणे

नखे चावण्याची सवयीमुळे दातांवर परिणाम होतो आणि जबड्यावरही परिणाम होतो.

Credit: iStock

Cold Drink

जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक किंवा कॉफी प्यायल्याने दात पिवळे होतात. तसेच दातांचे नुकसानही होते.

Credit: pexels

दातांनी बाटलीचे झाकण उघडणे

काहीजण कोल्ड्रिंकच्या बाटलीचे झाकण आपल्या दाताने उघडतात. ही खूपच चुकीची सवय आहे. या सवयीमुळे दात कमकुवत होतात. कधी-कधी दात पडण्याची भीती असते.

Credit: iStock

बर्फ

बर्फाचा कडकपणा आणि थंड तापमान यामुळे दात-हिरड्यांचे नुकसान होऊ शकते.

Credit: Pexels

दाताने काही तोडणे, चावणे आणि चघळणे

अनेकांना काही पदार्थ सातत्याने चावण्याची, चघळण्याची, दाताने काही तोडण्याची सवय असते. मात्र, यामुळे दात तुटण्याची भीती असते.

Credit: iStock

दात खाणे

अनेकांना तणाव आणि चिंतेमुळे दात एकमेकांवर जोरजोरात आपटण्याची सवय असते. मात्र, यामुळे दातांचे नुकसान होते.

Credit: Pexels

खूप जास्त ब्रश करणे

जोरजोरात दात घासल्याने हिरड्यांना त्रास होऊ शकतो.

Credit: pexels

धूम्रपान

धूम्रपानामुळे हिरड्यांना त्रास आणि आजार होऊ शकतो.

Credit: pexels

टूथपिक किंवा टाचणीचा वापर

दातात काही अडकल्यास टूथपिक, सुई यासारख्या तीक्ष्ण वस्तूंची मदत घेतली जाते. मात्र, यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. तसेच हिरड्यांचेही नुकसान होऊ शकते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मासिक पाळी असताना दूध पिणे उपायकारक असतं का?

अशा आणखी स्टोरीज पाहा