Apr 9, 2023
BY: Sunil Desaleसध्याच्या काळात तरुण वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं पहायला मिळत आहे. या सर्वांमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या सवयी आहेत.
Credit: pexels
सध्याची तरुणाई आळशी जीवन जगत आहे. कोरोना, लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम केल्याने अनेकांचे वजन वाढले आहे. मात्र, हा आळस तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो.
Credit: istock
काही तरुणांना अनुवाशिंक किंवा इतर कारणांमुळे मधुमेह होतो. अशा तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
Credit: istock
अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे कमी वयात उच्च रक्तदाब होतो जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Credit: istock
सध्याच्या काळात अनेक तरुण हे तणावात असतात. हा तणाव पुढे नैराश्याचे रूप घेतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
Credit: istock
सिगारेट आणि अल्कोहोल पिण्याच्या सवयींमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधीत आजाराची लक्षणे निर्माण करतात. यामुळे शरीरात चरबी निर्माण होते आणि हृदयरोग होतो.
Credit: istock
याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.
Credit: istock
सध्याच्या काळात अनेक तरुण ओव्हरटाईम करतात. त्यासोबत खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेत नाहीत. यामुळे हृदयाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Credit: istock
लठ्ठपणा हा हृदयासाठी हानिकारक आहे. यामुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढतो.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद